बांगलादेश आणि चीनमध्ये बनली धोरणात्मक सहमती, भारताला झटका !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बांगलादेश नेहमी भारतासाठी विश्वासू मित्र राहिला आहे, परंतु आता तेथे सुद्धा चीनचा आवाज ऐकू येऊ लागला आहे. नेपाळनंतर चीनने बांगला देशला आपल्या आर्थिक मदतीने आकर्षित करण्याचा प्रत्न सुरू केला आहे. बांगलादेशच्या मीडिया रिपोर्टनुसार, चीन बांगलादेशला नदी योजनांसाठी 1 अरब डॉलरचे कर्ज देणार आहे. भारतासाठी चिंतेची बाब यासाठी सुद्धा आहे की, अनेक प्रयत्नानंतर सुद्धा भारत-बांगलादेशमध्ये नदी विभागणीबाबत करार होऊ शकलेला नाही.

बांगल्यादेशच्या जलसंवर्धन मंत्रालयाच्या अंतर्गत जल विकास बोर्डचे अ‍ॅडीशनल चीफ इंजिनियर ज्योती प्रसाद घोष यांनी बेनार न्यूजशी बोलताना म्हटले की, तीस्ता नदीच्या व्यवस्थापनासाठी खुप मोठी योजना सुरू करण्यात येत आहे, ज्याच्या निधीसाठी चीनने सहमती दिली आहे. आशा आहे की, आपण डिसेंबर महिन्याच्यापूर्वी या योजनेला सुरूवात करू शकतो.

बेनार न्यूजच्या रिपोर्टनुसार, मे महिन्यात बांगलादेशच्या अर्थ मंत्रालयाने रंगपुर भागात तीस्ता नदी व्यवस्थापन योजनेसाठी 853 मिलियन डॉलरची मदत मागीतली. हे प्रथमच होत आहे की, चीन बांगलादेशच्या एखाद्या नदी व्यवस्थापन प्रकल्पात सहभागी होत आहे.

बांगला देशचे आणखी एक वृत्तपत्र डेली स्टारने इकॉनॉमिक रिलेशन डिव्हिजन (ईआरडी) ला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये मंत्रालयाने चीनकडून तीस्ता नदी प्रोजेक्टसाठी 883.27 मिलियनचे कर्ज मागितले होते. प्रोजेक्टच्या समरीत म्हटले होते की, सुरक्षात्मक पावले न उचलल्यामुळे प्रत्येक वर्षी पूरामुळे संपत्ती-घरांचे नुकसान होते. मातीची समस्यादेखील निर्माण होते.

भारतासोबत तीस्ता नदी जल विभागणी कराराबाबत बांगलादेश निर्णय घेण्याची वाट पहात आहे. बांगलादेशने अनेकवेळा आपल्या समस्यांसाठी भारताला कारणीभूत ठरवले आहे. बांगलादेश भारताच्या उतारावर आहे, यासाठी तो पाणीपुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या तीव्र विरोधामुळे हा करार मागील 8 वर्षांपासून रखडला आहे.

जल संवर्धन मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव कबीर बिन अनवर यांनी डेली स्टारला सांगितले की, भारताकडून बनवण्यात आलेल्या धरणांमुळे थंडीत पाण्याचा प्रवाह कमी होतो, ज्यामुळे बांगला देशमध्ये सुमारे दोन महिने जल संकटाची स्थिती असते. जर आम्ही ही योजना लागू केली तर थंडीत बांगलादेशाच्या मोठ्या भागात पाणीपुरवठा करता येईल.

तीस्ता नदी भारताच्या सो लामो मधून बाहेर पडते आणि सिक्किम, पश्चिम बंगालहून जाते. बांगलादेशच्या चिल्मडीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला मिळाण्यापूर्वी ती येथील रंगपुर डिव्हिजनमध्ये प्रवेश करते. तीस्ता त्या 54 नद्यांपैकी एक आहे जी भारतातून वहात बांगलादेशात प्रवेश करते.

मागील काही महिन्यांपासून ढाका आणि बिजिंगची जवळीक वाढत आहे. चीनने जून महीन्यातच बांगलादेशची 97 टक्के निर्यात टॅरिफ मुक्त करण्याची घोषणा केली होती. बांगलादेश आणि चीनमध्ये केवळ व्यापारी संबंधच नव्हे, तर दोघांनी आरोग्य क्षेत्रात सुद्धा सहकार्य वाढवले आहे. जून महिन्यात चीनकडून राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या प्रमुख डॉक्टरांचा एक गट महामारीला तोंड देण्यासाठी बांगलादेश सरकारची मदत करण्यासाठी पोहचला होता. तसेच बांगलादेशच्या आरोग्य मंत्र्यांनी चीनला आवाहन केले की, जेव्हा ते कोरोना वॅक्सीन बनवतील तेव्हा बांगलादेशला प्राथमिकता द्यावी.

बांगलादेश चीनची महत्वकांक्षी योजना बेल्ट अँड रोडमध्ये सुद्धा सहभागी झाला आहे. भारत आणि चीनमध्ये लडाखमध्ये हिंसक हाणामारी झाली, तेव्हा बांगलादेशकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आले नाही. एकीकडे, चीन-बांगलादेश जवळ येत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेश आणि पाकिस्तानच्या संबंधावर जमलेला बर्फ वितळू लागला आहे. या यापाठीमागे सुद्धा चीन फॅक्टर असू शकतो, असे म्हटले जात आहे.