Coronavirus : ‘कोरोना’ची माहिती लपविल्यामुळे चीनला जबाबदार धरा : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असून कोरोना विषाणूसंबंधी माहिती लपवल्याचा गंभीर आरोप करीत चीनमधील शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखील सरकारला यासाठी जबाबदार धरायला हवे असे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी  व्यक्त केले आहे. महामारी वेगाने संपूर्ण जगामध्ये कशी पसरली, याबाबत त्यांना सांगायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत कोरोनाचा रुग्ण सापडल्यापासून चीनवर टीका केली जात आहे. तसेच प्राण्यांच्या बाजारातून या विषाणूचा फैलाव झाल्याच्या पेइचिंग यांच्या थेअरीवरही अमेरिकेने अविश्वास व्यक्त केला आहे. कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून माणसांमध्ये पसरला आहे.

चीन सरकारने कोरोनासंबंधी चर्चा करणे सध्या खूपच गरजेचे आहे.  जर चीनमध्ये लोकशाही सरकार असते तर त्यांच्याकडून अशा प्रकारची माहिती लपवली गेली नसती. चीनच्या जनतेआधी या देशातील नेतृत्वाला याची पहिल्यांदा माहिती होती, ही खूपच धोकादायक बाब आहे. इथल्या कम्युनिस्ट सरकारकडून जगाला याबाबत माहिती देण्यापूर्वी यासंदर्भात अनेक घटना घडल्या संपूर्ण जगात लोक फिरत होते. एक लोकशाही सरकार असं करीत नाही. पारदर्शकतेची कमी असल्याने असे धोके निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.