Chinchwad Bypoll Elections 2023 | देवेंद्र फडणवीस यांची जगताप कुटुंबियांच्या घरी अचानक भेट; भेटीमुळे चर्चांना उधान

0
367
Chinchwad Bypoll Elections 2023 | pune-bypoll-election-shankar-jagtap-say-after-meeting-devendra-fadnavis-no-political-discussion
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chinchwad Bypoll Elections 2023 | पुण्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसबा (Kasba Bypoll Elections 2023) आणि चिंचवड मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जगताप कुटुंबियांच्या घरच्यांची अचानक भेट घेतली आहे. त्यामुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. दिवंगत नेते लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) किंवा लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याने चर्चेला उधान आले. यावर या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याबाबत शंकर जगताप यांनी स्पष्टीकरण दिले. (Chinchwad Bypoll Elections 2023)

 

या भेटीबाबत बोलताना शंकर जगताप म्हणाले की, ‘लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शोकसभा झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना घरी यायचे होते. कुटुंबाची भेट घ्यायची होती. त्यांनी त्यासंदर्भात माहिती देखील दिली होती. त्यानुसार त्यांनी आमची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

 

पोटनिवडणुकीसंदर्भात देखील कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांनी त्यांच्या लक्ष्मण जगताप यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी एखादं काम हाती घेतलं की ते पूर्णचं करायचे. त्यामुळे आमच्यात बंद दारामागे कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.’ असे शंकर जगताप यावेळी बोलताना म्हणाले. (Chinchwad bypoll elections 2023)

कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुक बिनविरोध करण्याचा भाजपचा मानस आहे. मात्र जर चिंचवड येथील उमेदवारी आश्विनी जगताप यांना दिली गेली तरचं ते शक्य होणार आहे. कारण शंकर जगताप यांना तिकीट दिले गेल्यास विरोधकांकडून निवडणुक लढविण्याबाबत सुतोवाच केले गेले आहे.
त्यामुळे आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी आणि शंकर जगताप यांची समजुत काढण्यासाठीच
देवेंद्र फडणवीस जगताप कुटुंबियांच्या घरी आले असावेत (Pune Bypoll Elections 2023). अशी चर्चा रंगली आहे.
पण यावेळी ते माध्यमांशी संवाद न साधताच पुढे मार्गस्थ झाले. तर ही भेट राजकीय नव्हती.
यात उमेदवारीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. असे शंकर जगताप म्हणाले.

 

 

Web Title :- Chinchwad Bypoll Elections 2023 | pune bypoll election shankar jagtap
say after meeting devendra fadnavis no political discussion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा