मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | देशात 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर एका वृत्तवाहीनीने आणि ‘सी वोटर’ने केलेला सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार 2024 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 34 जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात (Maharashtra Politics) आले आहे. तर भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) पिछाडीवर पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राणे यांना खोचक टोला लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, 34 मतदारसंघाची यादी पाहिली नाही. मात्र, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) पुन्हा उमेदवारी देतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, नारायण राणे लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) उभारले, तर अडीच लाख मतांनी त्यांचा पराभाव करण्याचा निर्धार मतदरांनी केला असल्याचे राऊत म्हणाले.
नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना विनायक राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ समजत नाही. त्यामुळे दिल्ली सोडून जिल्हा नियोजनाच्या बैठकीला येऊन बसतात. राणे यांनी त्यांच्याच खात्यातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेतले. त्या अधिकाऱ्या पदाचा दुरुपयोग करुन राणेंच्या आशिर्वादाने भ्रष्टाचार (Corruption) केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
नारायण राणे यांनी ज्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेतले,
त्या अधिकाऱ्याने दोन तरुणींची फसवणूक (Cheating) करुन लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली.
त्यामुळे लवकरच नारायण राणे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला.
Web Title :- Maharashtra Politics | vinayak raut taunt narayan rane over remove modi government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल
Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत
Latur Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल