Pune Crime News | दत्तवाडीतील जूगार अड्ड्यावर छापा; १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | दत्तवाडी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार, मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून ६६ हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

दत्तवाडी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जूगार, मटका सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. यानूसार पथकाने सापळा रचून जूगार खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून जूगाराचे साहित्य, मोबाईल असा ६६ हजार ५०५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

 

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार अजय राणे, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्यासह पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Raids on gambling dens in Dattawadi; A case has been registered against 15 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा