Coronavirus : ‘कोरोना’वर वॅक्सीन नव्हे तर औषध, आणखी एक ‘टेस्ट’ यशस्वी

बीजिंग : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अद्याप यावर कोणतेही औषध किंवा लस बाजारात उपलब्ध झालेली नाही. जगभरातील अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत असून अमेरिकेतील एका कंपनीने लस शोधल्याचा आणि त्याची ह्युमन ट्रायल घेतल्याचा दावा करताना याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. तर कोरोनाला अटकाव करणारे औषध विकसित केले असल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

चीनमधील पेकिंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. या औषधाने कोरोनाबाधिताच्या प्रकृतीत फक्त सुधारणा होणार नसून काही वेळेसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रयोग कोरोनाबाधित उंदरावर यशस्वी झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना विद्यापीठाच्या इनोव्होशन सेंटर फॉर जीनोमिक्सचे संचालक सनी शी यांनी सांगितले की, कोरोनाबाधित उंदरावर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. कोरोनाबाधित उंदरांना हे औषध देण्यात आल्यानंतर चांगले सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.

सॅन झी यांनी बाबत माहिती देताना सांगितले की, या औषधाची क्लिनिकल चाचणी सध्या सरु आहे. ही क्लिनिकल चाचणी अन्य काही देशातही होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सध्या पाच औषधांची चाचणी मनुष्यावर सुरु असल्याची माहिती एका आरोग्य अधिकाऱ्याने दिली. प्लाज्मा थेरेपीमुळे देखील चीनमधील 700 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.