पिडीत विद्यार्थीनीनं बंद खोलीत न्यायाधीशांना ‘सगळं’ सांगितलं, चिन्मयानंदने ‘कसा’ काढला आंघोळीचा व्हिडीओ आणि नंतर ‘काय’ केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री चिन्मयानंद यांची एस आय टीने कसून चौकशी केली होती. चिन्मयानंद यांच्यावर एका लॉ करणाऱ्या विद्यार्थिनीने गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात सोमवारी गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीने कलम १६४ अन्वये न्यायालयात निवेदन केले. पोलिस संरक्षणात ती कोर्टाच्या आवारात पोहोचली आणि न्यायाधीशांसमोर हजर झाली.

सोमवारी सकाळी १०.१५ वाजता या विद्यार्थिनीने महिला पोलिस दलासह कोर्टाच्या आवारात प्रवेश केला. पोलिसांनी या विद्यार्थिनीला सीजेएम कोर्टात नेले. तेथे विद्यार्थिनीला कबुलीजबाब देण्यासाठी महिला न्यायाधीशांकडे नेण्यात आले. सुमारे दोन तास निवेदन नोंदविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनीला दोन वाजता निवेदन दिल्यानंतर महिला पोलिसांनी सोबत नेले. कोर्ट सोडल्यानंतर विद्यार्थिनीसह तिचे वडील व भाऊही होते. कोर्टाच्या आवारात मुलीच्या आगमनाची माहिती वकिलांना आणि फिर्यादींना समजली तेव्हा तेथे वातावरण चांगलेच तापू लागले होते.

सोमवारी सायंकाळी स्वामी चिन्मयानंद यांची प्रकृती खालावली. स्वामी चिन्मयानंद यांना पाहण्यासाठी डॉक्टरांची टीम मुमुक्षु आश्रमात दाखल झाली. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत.

एका लॉ च्या विद्यर्थिनीने चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. दिल्लीतही खटला दाखल करण्यात आला. विद्यार्थिनीने ४३ व्हिडिओ क्लिपची पेन ड्राईव्ह एसआयटीला दिली. एफआयआर बारा पानांची होती असे सांगितले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्मयानंद यांनी त्या मुलीच्या आघोळीचा व्हिडिओ कसा बनविला होता याबद्दल मुलीने तिची संपूर्ण कहाणी न्यायाधीशांना सांगितली असावी कारण हाच व्हिडिओ दाखवून चिन्मयानंदनी वर्षभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like