Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार ! शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री राणेंना ‘शह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाल चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ (Chipi Airport Inauguration) लवकरच खुले होणार आहे. चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून चांगलाच वाद पेटला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध केला होता. परंतु आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे (Union Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde) यांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबरला विमानतळाचे उद्घाटन (Chipi Airport Inauguration) होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन हे विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण 286 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली. सुमारे 520 कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. (Sindhudurg Airport Pvt. Ltd.) यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसंच ऑपरेशन्स (DBFO) साठी लीजवर हे काम देण्यात आले आहे. त्यांनी हा खर्च केला असल्याची माहिती देसाई यांनी सांगितली. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

विमानपत्तन प्राधिकरण (Airport Authority of India) नागर विमानन महानिदेशालय (DGCA) यांच्या तर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या (Sindhudurg district) शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमान वाहतूक सुरु झाल्याने अधिकाधिक पर्यटकांना पोहोचता येणार आहे, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

 

उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांची गरज नाही – राणे

विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असणे काहीही गरजेचं नाही, असं म्हणत टीकास्त्र सोडले होते.
तर दुसरीकडे, भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे,
चालत्या गाडीत शिरण्याचा प्रयत्न म्हणजे विनायक राऊत (Vinayak Raut) आहेत.
चालत्या गाडीत शिरल्याने श्रेय मिळत नाही. जर तुमचं श्रेय होत तर गेल्या 15 वर्षात विमानतळाचं उद्घाटन का नाही झालं.
जर तुमची मेहनत होती तर गेली दोन वर्षे तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून का बसला होतात.
राणेंचा पाठपुरवठा आणि भाजप याआधारावर कोकणवासीयांना ही सेवा मिळणार आहे, असा दावा केला होता.
परंतु आता शिवसेनेनं देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असं म्हणत भाजप आणि राणेंना शह दिला आहे.

Web Title : Chipi Airport Inauguration | cm uddhav thackery was present at the inauguration of the chipi airport at sindhudurg

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 257 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Anti Corruption | पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक 5 लाखाच्या लाच प्रकरणी ‘गोत्यात’, एक लाख घेताना झाला ट्रॅप

Karuna Munde | बीड पोलीस करुणा मुंडे यांच्या सांताक्रुझमधील निवासस्थानी दाखल