Cholesterol वाढवण्यासाठी हे ५ फॅक्टर्स जबाबदार, करू नका दुर्लक्ष, अन्यथा होऊ शकतो जिवाला धोका!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) वाढते प्रमाण हे आपल्या शरीरासाठी धोक्याची घंटा आहे, कारण त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्टअटॅक आणि मधुमेह यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे मृत्यूची भीती असते. सामान्यत: हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे दिसून येत नाहीत आणि हे केवळ लिपिड प्रोफाइल चाचणीद्वारे शोधली जाऊ शकते. म्हणूनच हा धोका वाढवणाऱ्या अशा गोष्टींना आळा घालणे आवश्यक आहे. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी वाढवणारे घटक कोणते ते जाणून घेऊयात.

 

1. अनहेल्दी डाएट
जर तुम्ही फळे आणि भाज्या यांसारख्या खाद्य पदार्थांऐवजी तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांचे सेवन करत असाल तर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यास तुम्हीच जबाबदार आहात. म्हणूनच तेलकट अन्न, रेड मीट आणि प्रोसेस्ड फूड शक्यतो टाळणे महत्त्वाचे आहे.

 

2. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी
जर तुम्ही दिवसाचे ८ ते १० तास बसत असाल, तर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा (Cholesterol) धोका वाढतो, सहसा ऑफिसच्या कामात किंवा वर्क फ्रॉम होम करताना हा धोका वाढतो. म्हणूनच महत्त्वाचे काम असूनही मध्येच फेरफटका मारणे आवश्यक आहे. यासोबत, तुम्ही जेवढी शारीरिक हालचाल वाढवाल, तेवढा धोका कमी होईल.

 

3. स्मोकिंग
स्मोकिंग ही एक वाईट सवय आहे, ज्यामुळे फुफ्फुसांचे खूप नुकसान होते, परंतु तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की या सवयीमुळे ब्लड व्हेसल्स खराब होतात आणि त्यामुळे त्या अरुंद होतात व त्यात कोलेस्ट्रॉल जमण्याची शक्यता निर्माण होते.

4. टाइप २ डायबिटीज
जे लोक टाइप-२ डायबिटीजचे रुग्ण आहेत, त्यांची ब्लड शुगर लेव्हल अनेक पटींनी वाढते,
ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, खराब झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होण्याचा धोका वाढतो,
त्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रित करणे आवश्यक आहे.

 

5. हार्ट डिसीजची फॅमिली हिस्ट्री
जर तुमचे आई-वडील, आजी-आजोबा, काका, काकू किंवा भावंडांना लहान वयातच हृदयविकार झाला असेल,
तर तुम्हाला सुद्धा कोलेस्टेरॉल वाढण्याचा आणि हृदयविकार होण्याची दाट शक्यता आहे.
अशावेळी, आपण अधिक सतर्क असणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cholesterol | photo gallery high cholesterol risk factors physical activity diet smoking type 2 diabetes heart disease family history

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Neeraj Chopra | नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम! उसेन बोल्टचा ‘तो’ विक्रम मोडला

Malaika Arora | मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सुनावले खडेबोल; म्हणाली “तुम्ही काय तिचे……”

CM Eknath Shinde | ‘काम करण्याची चर्चा होते, अन् बिनकामाचे मोर्चा काढतात’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला (व्हिडिओ)