काय सांगता ! होय, तेलगंणाचे ‘ते’ आमदार हे जर्मन नागरिक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – तेलगंणाचे आमदार हे जर्मन नागरिक आहेत. त्यांना फसवणुकीने भारतीय नागरिकत्व मिळाले आहे आणि ते त्यांनी लपवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आल्याचे केंद्र सरकारने माहिती दिली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार रमेश चेन्नमनेनी यांचे नागरिकत्व रद्द केले आहे.

रमेश चेन्नमनेनी हे सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार आहेत. ते हैदराबादपासून १५० किमी दूर असलेल्या वेमुलावाडा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते चंद्राबाबु नायडु यांच्या तेलगु देशम पक्षाकडून २००९ मध्ये सर्वप्रथम आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी एका वर्षाच्या आता राजीनामा देऊन के चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षात प्रवेश केला. पोटनिवडणुकीत ते २०१० पुन्हा निवडून आले. त्यानंतर ते २०१४ आणि २०१८ मध्ये पुन्हा निवडून आले आहेत.

नागरिकत्व मिळविण्याच्या एक वर्ष अगोदर ते भारतात पूर्ण वर्षभर असावे लागते. चेन्नमनेनी यांनी आपली खरी माहिती लपवून ठेवून नागरिकत्व मिळविले आहे. चेन्नमनेनी यांनी आपल्या परदेशी दौऱ्यांची माहिती लपवून ठेवली व फसवणुक करुन भारतीय नागरिकत्व मिळविले असल्याचे त्यांचे नागरिकत्व रद्द केल्याचे केंद्र सरकारच्या गृह विभागाने म्हटले आहे.

याबाबत चेन्नमनेनी यांनी सांगितले की, तेलंगणा उच्च न्यायालयाने यापूर्वी एक अनुकुल निर्णय दिला होता. परंतु, गृह मंत्रालयाने त्याबाबत विचार केला नाही आणि पुन्हा नागरिकत्व रद्द केले. त्यामुळे नागरिकत्वाचे सरंक्षण करण्यासाठी आम्ही पुन्हा हायकोर्टात जाणार आहोत.

Visit : Policenama.com