स्वच्छ आणि सुंदर TOP 10 मध्ये राज्यात ‘हे’ शहर नंबर 1

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वच्छ भारत ,सुंदर भारत या अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सलग तिसऱ्या वर्षी मध्य प्रदेशातील इंदौर शहराला सर्वात स्वच्छ सुंदर शहर होण्याचा मान मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशातील सर्वात स्वच्छ शहरणाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत या टॉप १० स्वच्छ आणि सुंदर शहरांचा गौरव करण्यात आला.

स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इंदौर, अंबिकापूरआणि तिसऱ्या क्रमांकावर म्हैसूर शहराचा क्रमांक लागतो. यानंतर उज्जैनचा नंबर लागतो. देशाची राजधानी दिल्ली या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

इतर विभागातील शहरामध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात अहमदाबादचा पहिला नंबर लागतो. तर वेगाने लोकसंख्या वाढणाऱ्या शहरांमध्ये रायपूरचे स्थान पहिले आहे.तीन लाखांपेक्षा जास्त आणि १०लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात उज्जैन एक नंबरवर आहे. तर १ ते ३ लाख लोकसंख्येच्या शहरात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील सर्वात स्वच्छ शहरांची नावे पुढीलप्रमाणे :

1. इंदौर मध्यप्रदेश, 2.
अंबिकापुर, छत्तीसगढ़,
3. म्हैसूर, कर्नाटक,
4. उज्जैन, मध्यप्रदेश,
5. नवी दिल्ली,
6. अहमदाबाद, गुजरात,
7. नवी मुंबई, महाराष्ट्र
8. तिरुपति,
9. राजकोट, गुजरात
10. देवास, मध्यप्रदेश

You might also like