मोदी यांच्या त्सुनामीत देशातून काँग्रेसचा सुपडा साफ : खा.दिलीप गांधी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – आजच्या निकालाने संपूर्ण भारतात नरेंद्र मोदींची महासुत्नमीची मोठी लाट आली असून, या लाटेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा सुपडासाफ झाला आहे, असे मावळते खा. दिलीप गांधी म्हणाले.

संपूर्ण भारतात लोकसभेचे निकाल जाहीर झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची बहुमाताकडे घोडदौड करत 300 हून अधिक जागा जिंकत आहेत. राज्यातही मोठे यश युतीला मिळाले आहे. या विजयाचा जल्लोष आज दुपारी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयात करण्यात आला. भाजप कार्यालयात सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. जस-जसे निकाल समजत होते, तस-तशी कार्यकर्त्यांमधील उत्सुकता वाढतच होती. शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. लक्ष्मी कारंजा चौकात फटाके वाजवून व लाडू वाटून हा विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

देशात झालेली लोकसभा निवडणुक ही सर्वात मोठा महोत्सव होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीसह एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी हा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जे गरीबांना समर्पित होऊन योजना राबविल्या. देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली; हे जनतेला भावले आहे. काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळेल की नाही, याची शंका निर्माण झाली आहे. नगरमध्येही जनतेने सर्व जाती-पातीच्या भिंती तोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली असल्याने नगर व शिर्डीच्या दोन्ही जागा युतीकडेच राहिल्या आहेत.

यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस किशोर बोरा, सुनिल रामदासी, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, गीतांजली काळे, श्रीकांत साठे, नाना भोरे, अन्वर खान, शुभांगी ठाकूर, नुतन कांबळे, संगीता मुळे, लिला अगरवाल, नंदा कुसळकर, सुरेख खरपुडे, सुनिल पंडित, चेतन जग्गी, संजय ढोणे, तुषार पोटे, भरत सुरतवाला, शशांक कुलकर्णी, अभिजित चिप्पा, अविनाश साखला, जालिंदर शिंदे, प्रशांत मुथा, कुमार दळवी, संतोष शिरसाठ, संदिप पवार, सुभाष साळवे, मंगेश भिडे, बबन गोसकी, राजेंद्र तापकिरे, अशोक भोसले, वसंत राठोड, अविनाश सोनवणे, गौतम बनसोडे, नितीन जोशी, पियुष जग्गी, नाथा देवतरसे, संजय सातपुते, राहुल रासकर, कुसूम शेलार, मनेष साठे, गौरव गुगळे, केदार लाहोटी, सुजित खरमाळे, मिलिंद भालसिंग, चंद्रकांत पाटोळे, मुकुंद पंत, मंगेश निसळ, सागर गोरे, राजू वाडेकर, नरेंश चव्हाण आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.