‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात श्रीकृष्णासारखे चातुर्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप सध्या विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी अनेक नवनवीन बातम्या येतात. मुंबई भाजपा अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांच्यात श्रीकृष्णासारखे चातुर्य असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात मावळते अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. शेलार यांचेही कौतुक लोढा यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ३६ जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१४ च्या निवडणुकीचा उल्लेख करताना त्यावेळी ४८ तास आधी युती तुटल्याने १५ जागा जिंकलो होतो. पण आता युती झाली आहे त्यामुळे ३६-० अशी मॅच जिंकायची आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच कार्यक्रमाला कार्यकर्ते आलेत हे फक्त शेलार यांच्यामुळेच असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्‍याचेही त्यांनी कौतुक केले तर मुख्यमंत्र्‍यांनीही यावेळी लोढा यांचे कौतुक केले.

तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे. त्यांचे नेतृत्त्व हे फक्त चांगले नसून राजकारणासाठी उत्तम आहे, असं कौतुक लोढा यांनी केले तर मुख्यमंत्र्‍यांनीही लोढा यांचे कौतुक करत त्यांना हाडाचे कार्यकर्ते असल्याचे म्हटलं. तसंच लोढा कोणत्याही कामात स्वतःला झोकून देतात. बॅक ऑफिसप्रमाणे सायलेंटपणे काम करणं ही त्यांची खासियत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like