CM Eknath Shinde | ‘हा फेव्हिकॉलचा जोड आहे, फडणवीसांसोबतची दोस्ती कधीही तुटणार नाही’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता, तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. पालघर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’! कार्यक्रमात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले, देवेंद्रजी यांच्या नेतृत्त्वात परकीय गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र नंबर वन होता, आता पुन्हा नंबर वन झाला आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन झाल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पालघरमधील भाषणात केला. तसंच पंचामृत अर्थसंकल्प (Budget) म्हणत एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आमचं सरकार जनतेच्या दारात पोहोचतंय. आतापर्यंत 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आमचं शासन पोहोचले. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं, आमच्या सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. सुरुवातीला आम्ही दोघेच मंत्रिमंडळात होतो. आता त्यामध्ये अनेकांचा समावेश झाला. कोणाला वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय घेतला नाही. सगळे निर्णय जनतेसाठी घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरु केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government)
बंद केल्या. पण त्या योजना लोकहिताच्या होत्या.
मात्र आता डबल इंजिन सरकार सत्तेत आहे. फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा मविआने करुन घेतला नाही.
आता आम्ही बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या.
राज्याला विकासाच्या वाटेवर आणलं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm eknath shinde praises devendra fadnavis after shivsenas advertisement row in palghar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा