CM Eknath Shinde | गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचे खास ट्विट; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | आज गुरूपौर्णिमा (Gurupoornima). गुरुपौर्णिमेच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असते. गुरूला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आजच्या या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांशी प्रतारणा नाहीच असं म्हटलं असल्याने सध्या राजकीय वर्तुळात या ट्विटचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा एक फोटो शेअर केला असून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन… असं ट्विट शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, मंगळवारी शिंदे म्हणाले होते की, मी एक सामान्य कार्यकर्ता असून मुख्यमंत्री पदाची हवा डोक्यात जाणार नाही. आम्ही कधी कोणाच्या वाटेला जात नाही आणि जर कोणी गेला तर आम्ही त्याला सोडत नाही, असेही ते म्हणाले होते.

मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहासमोर हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. तुमच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री म्हणून बसली आहे असे समजा. आमदार बांगर हे विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच शिंदे गटात सामील झाले होते.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी बांगर यांना जिल्हाप्रमुखपदावरून हटविले होते.
मात्र, बांगर हेच जिल्हाप्रमुखपदावर कायम असतील, असे शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले.
तडीपाऱ्या झाल्या. मात्र मी मुख्यमंत्री असताना एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही.
येत्या काळात शिवसैनिकाचा बाल बांका करण्याची कोणाची हिंमत होणार नाही असेही ते म्हणाले होते.

 

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde tweet on the occasion of guru poornima

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा