CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांची टीका, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र क्रमांक एकवर आणला होता, पण…’

छत्रपती संभाजीनगर: पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray | मराठवाड्यातील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी (Marathwada Cabinet Meeting) मागील दोन दिवसात विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज करत होते. या बैठकीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचे कौतुक करत शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लक्ष्य करत कालच्या विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. (CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा विदेशी गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. मात्र नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात गुजरात पुढे गेला. मात्र अभिमानाने सांगतो, आपले सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा क्रमांक एकवर गेला. आमच्या कार्यकाळात आम्ही एकही निर्णय कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला नाही. (CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray)

गणेश मंडळांना देण्यात आलेल्या परवानगी बाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, जी सार्वजनिक गणेश मंडळं शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात त्यांना आता दरवर्षी संमती घेण्याची गरज नाही. त्यांना आपण पाच वर्षांची संमती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मंडप वगैरेचे पैसे घ्यायचे नाहीत, उगाच दात कोरुन पोट कशाला भरायचे. उत्सव सुरु करण्यामागचा लोकमान्य टिळक यांचा हेतू अत्यंत उदात्त होता. तो हेतू ही मंडळं करत असतात. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील स्तुतीसुमने उधळली. मुख्यमंत्री म्हणाले, आपला देश प्रचंड प्रगती करतोय. देशाची अर्थव्यवस्था मोदींनी ५व्या क्रमांकावर नेली. दिल्लीतील जी २० परिषदेला सर्व जगातून लोक आले होते. जगाला भारतात आणण्याची जादू, जगाचे मन जिंकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदींच्या नेतृत्वात देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीत लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील योजना आणि केलेल्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
आम्ही एनडीआरफचचे नियम डावलून मदत दिली. १ रुपयात पिक विमा योजना दिली.
केंद्र सरकारचे ६००० तसेच राज्य सरकारने सुद्धा ६००० देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला सक्षमीकरणाला बळ दिले. शासकिय नोकऱ्यांचा आकडा दीड लाखांपर्यंत जाणार आहे.
यासाठी मंगल प्रभात लोढा स्किल डेव्हलपमेंट विभागातर्फे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘परदेशी गुंतवणूक कमी होण्यास…’

MNS Likely To Contest Pune Lok Sabha | मनसे लढवणार आगामी लोकसभा; पुणे मतदारसंघासाठी
उमेदवाराचा शोध सुरू

Keshav Upadhye Criticizes INDIA Aghadi And Congress | वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील
बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही

Marathwada Cabinet Meeting | मराडवाड्यासाठी ४५ हजार कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा