MNS Likely To Contest Pune Lok Sabha | मनसे लढवणार आगामी लोकसभा; पुणे मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Likely To Contest Pune Lok Sabha | आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकांची (Lok Sabha Elections 2024) तयारी सर्व पक्षांनी सुरु केली असून राज्यामध्ये देखील निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांची इंडिया आघाडी (INDIA Aghadi) तयार झाली असून भाजपाने (BJP) देखील कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसे पक्ष ॲक्शनमोडमध्ये आला आहे. या निवडणूकीमध्ये अनेक पक्षांचे लक्ष हे पुणे लोकसभा मतदारसंघावर आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Late MP Girish Bapat) यांचे निधन झाल्यामुळे भाजपा देखील नवीन ताकदीचा चेहरा शोधत आहे. आता या पुणे मतदारसंघासाठी मनसे पक्ष देखील त्यांचा पक्षाचा प्रबळ उमेदवार शोधण्याच्या तयारीला लागला आहे. या संदर्भात मनसेची आढावा बैठक पार पडली असून यामध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. (MNS Likely To Contest Pune Lok Sabha)

मनसेचे पुणे लोकसभेचे निरीक्षक अमित ठाकरे हे असून त्यांच्या सुचनेप्रमाणे ही आढावा बैठक पार पडली आहे. मागील आठवड्यात अमित ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला होता. यावेळी इच्छुकांची नावे पुढे आली होती. मनसेकडून पुणे लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक असले तरी उमेदवाराच्या बाबतीत निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील असे सांगण्यात आले आहे. अमित ठाकरे यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये आधी उमेदवाराचे नाव निश्चित करा, अशी मागणी करण्यात आली होती. मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, कोणते मुद्दे उपस्थित केले पाहिजेत, पुण्यातील कोणत्या भागात पक्ष संघटन मजबूत आहे आणि कोणत्या भागावर अधिक जोर देण्याची आवश्यकता आहे, या संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. यावेळी स्थानिक पातळीवर बैठक घेण्याची सूचनाही अमित ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार मनसेची आढावा बैठकीची पहिली फेरी पूर्ण झाली. (MNS Likely To Contest Pune Lok Sabha)

मनसे आगामी लोकसभा लोकसभा निवडणूक लढविणार आहे त्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मनसेच्या आढावा बैठकीमध्ये पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, अजय शिंदे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी मार्गदर्शन केले. अजय शिंदे यांनी सांगितले की, “या आढावा बैठका पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ पक्षाच्या ताकतीचा आढावा घेण्यात आला. उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. आढावा बैठकीची दुसरी फेरी गणेशोत्सवानंतर होणार असून, त्यानंतर अमित ठाकरे हे विभागनिहाय मेळावे आणि बैठका घेणार आहेत.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | दंड माफ करण्यासाठी लाच घेताना महावितरणचा कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक, 5 गुन्हे उघडकीस

Keshav Upadhye Criticizes INDIA Aghadi And Congress | वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील
बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही