CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ‘परदेशी गुंतवणूक कमी होण्यास…’

Maharashtra Politics News | eknath shinde and uddhav thackeray will come together says ashish deshmukh
File Photo

छत्रपती संभाजीनगर: पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणे दिसून आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आऱोप प्रत्यारोप सुरु असतात. दरम्यान, आज देखील मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून मधल्या काळामध्ये विकास थांबला असल्याचा घणाघात केला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव देखील बदल्यात आले असल्याचे जाहीर केले. (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, “मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात परदेशी गुंतवणूक यासाठी महाराष्ट्र एक नंबरवर होता. मात्र मधल्या काळात मागे पडला. आता पुन्हा तो 1 नंबरवर आणण्याचा प्रयत्न करतोय. असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray)

पुढे ते म्हणाले की, मराठवाड्यातील मध्यवर्ती शहर म्हणून आता औरंगाबाद म्हणायचं नाही, तर संभाजीनगर शहर म्हणायचं. पायाभूत सुविधांना आपल्या सरकारने प्राधान्य दिले आहे (Marathwada Cabinet Meeting) . 2 हजार 700 कोटी रुपयांची पाणीयोजना दिली. रस्त्यांसाठी 500 कोटी दिले. आज मंत्रीमंडळ विशेष बैठक होणार असून, यामध्ये मराठवाड्याचा फायदा होणार आहे. मराठवाड्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली. दुसरा टप्पा ही लवकरच सुरु होईल.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आणि लोकांच्या हिताचा निर्णय घेत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. ते म्हणाले की, सिंचन प्रकल्प, शेतपिकात बदल, कोल्डस्टोरेज यासारखे अनेक निर्णय आपण घेत आहेत. संताची भुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भुमीला भविष्यात आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व प्राप्त होईल. स्वामी रामानंद तीर्थ यांचे दिल्लीत स्मारक असलं पाहिजे असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आणि नक्कीचं यावर आपण निर्णय घेऊ. कृषी विद्यापीठांचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. कृषी संशोधक यांनी शेतकरी यांना मार्गदर्शन केलं पाहिजे.” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांच्या हिताच्या असणाऱ्य़ा 1 रुपयात पिक विमा या योजनेबद्दलही शिंदेंनी सांगितले की,
यापुढे चांगला पाऊस पडेल आणि कोठा पुर्ण करेल असे वाटत आहे. पण सरकार आपल्या पाठीशी आहे.
आम्ही एनडीआरफचचे नियम डावलून मदत दिली. 1 रुपयात पिक विमा योजना दिली.
केंद्र सरकारचे सहा हजार त्याचप्रमाणे राज्य सरकारने सहा हजार देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला सक्षमीकरण याला ही प्राधान्य दिलं आहे. शासकिय नोकऱ्यांचा आकडा दीड लाखांपर्यंत जाणार आहे.
यासाठी मंगल प्रभात लोढा ही स्किल डेव्हलपमेंट विभागातर्फे प्रयत्न करत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | दंड माफ करण्यासाठी लाच घेताना महावितरणचा कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक, 5 गुन्हे उघडकीस

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Kale Padal police arrests man who stole 15 cars worth Rs 19 lakh from Khadi Crushing Plant; The theft was done with the help of a worker from Khadi Crushing Plant (Video)

Pune Crime News | खडी क्रशींग प्लांटमधील 19 लाखांच्या 15 मोटारी चोरणाऱ्यास काळे पडळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खडी क्रशींग प्लांटमधील कामगाराच्या मदतीने केली होती चोरी (Video)

Pune Crime News | Two thieves beat up a young man carrying a gold string for a mangalsutra and stole gold worth Rs 3 lakhs, the incident happened in the evening during the rush hour in Liyavar Peth (Video)

Pune Crime News | मंगळसुत्रासाठीची सोन्याची तार घेऊन जाणार्‍या युवकाला मारहाण करुन दोघा चोरट्यांनी 3 लाखांचे सोने नेले चोरुन, रविवार पेठेतील ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळची घटना (Video)