CM Eknath Shinde | ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ अजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांचा टोला, म्हणाले- ‘तारतम्य बाळगून…’

सिल्लोड : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याविषयी भाष्य केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केलं आहे. सिल्लोड येथे सभेत बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, सर्वांनी माहिती घेऊन आणि तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. कारण, छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी, धर्मासाठी स्वराज्यासाठी त्याग केला. संभाजी महाराजांवर औरंगजेबाने अत्याचार केले. तरीही धर्म आणि स्वराज्यासाठी त्यांनी तडजोड केली नाही. धर्मवीर ही पदवी तुम्ही-आम्ही दिलेली नाही.

 

संभाजी महराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या सारख्यांनी असं बोलणं योग्य नाही. सर्व माहिती घेऊन त्यांनी बोललं पाहिजे. कारण, महापुरषांचा अपमान करणाऱ्यांवर अजित पवारांनी टीका केली होती. परंतु अशा प्रकराचं वक्तव्य निंदाजनक आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

काय म्हणाले होते अजित पवार?

महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक (Swarajrakshak) होते, धर्मवीर (Dharmaveer) नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात.
मी मंत्रिमंडळात असताना त्यावेळी स्पष्ट सांगितले होते, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा,
अशी भूमिका अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना मांडली होती.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde on ajit pawar over
chhatrapati sambhaji maharashtra dharmveer statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा