MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

मुंबई : MP Sanjay Raut | काल चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections Results) निकाल लागला. पैकी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाने (BJP) अनपेक्षित असे मोठे यश मिळवले. एक्झिट पोल (Exit Poll) देखील या निकालानंतर खोटे ठरले आहेत. यामुळे अनेकांना हा निकाल आश्चर्यकारक वाटला आहे. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, जनादेशाचा आपण स्वीकार करतो, पण लोकांच्या मनात शंका आहे, ती दूर केली पाहिजे, असे म्हणत ईव्हीएमवर (EVM ) संशय व्यक्त केला आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो, पण लोकांच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निकालानंतर आमच्या, लोकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. त्यामुळे, एक निवडणूक बॅलेट पेपरवर (Ballot Paper) घेऊन दाखवा आणि लोकांच्या मनाती शंका दूर करा.

संजय राऊत पुढे म्हणाले, लोकसभा किंवा विधानसभा एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, म्हणजे लोकांना बोलण्याची
संधी राहणार नाही. आता, मुंबई महापालिका आणि मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा,
आम्ही तयार आहोत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार

तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना

RMD Foundation | रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल

फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत मित्राचा दुसऱ्यावर चाकू हल्ला, एकाला अटक; पुण्यातील डोणजे परिसरातील घटना

Pune Pimpri Crime News | गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड परिसरातून अटक, गुन्हे शाखेकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार