CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ”मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”, पंतप्रधानांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

नवी दिल्ली : CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील (Ram Mandir Ayodhya) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण (Invitation) आपल्याला मिळाले नसल्याचे शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्पष्ट केले आहे. तसेच, राम मंदिर सोहळा भाजपाचा (BJP) राजकीय कार्यक्रम झाला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) कौतुक करत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray) डागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आधी काहीजण मंदिर वहीं बनाएंगे, लेकीन तारीख नहीं बताएंगे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायचे. मात्र, मोदींनी मंदिरही बनवले आणि तारीखही सांगितली आहे. आरोप करणाऱ्यांची अवस्था मुंह में राम बगल में छुरी अशी आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा राजकीय कार्यक्रम होऊ शकत नाही. असे बोलणाऱ्यांना राम भक्त उत्तर देतील. आता घरी बसलेले आहेत. राम भक्त कायमचे घरी बसवतील. म्हणून विचार करून विधाने करावीत. अयोध्येतील राम मंदिर हा करोडो भक्तांच्या अस्मितेचा विषय आहे. (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray)

काय म्हणाले उद्धव ठाकरे…
भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नाही. अयोध्येत राम मंदिर होणे, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केला आहे. राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्याने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.

राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडले असून अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे राम मंदिर उद्घाटन सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.