“सुजय विखेंचा निर्णय योग्यच ; एक दिवस कुटुंबालाही पटेल”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ता रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथील गरवारे हॉलमध्ये पार पडला.

सुजय विखे यांनी यावेली बोलताना आपले मत व्यक्त केले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशाला घरातून विरोध असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या प्रवेशावेळी त्याचे वडिलही उपस्थित नव्हते. सुजय यांच्यासोबत त्यांची पत्नी धनुश्री याच होत्या. कुटुंबाविरोधात भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठी जबाबदारी आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी यावर सुचक वक्तव्य करत सुजय विखे यांचा निर्णय योग्यच आहे, असं सांगितलं. घरातून विरोध असतानाही त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मात्र पुढे एक ना एक दिवस त्यांच्याही लक्षात येईल की तुमचा भाजपमध्ये येण्याचा निर्णय योग्यच होता, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

ह्याहि बातम्या वाचा-

संघ आणि भाजपा या दोन्हींच्या विचारधारेला हरवायचं ; काँग्रेसचा संकल्प

सुरेश प्रभुंना उमेदवारी द्या अन्यथा शिवसेनेचा प्रचार करणार नाही

#GST : १ एप्रिल पासून घरे स्वस्त होणार, ‘इतक्या’ लाखांचा होणार फायदा

पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्यानेच मारला ३१ लाखांवर डल्ला

‘ऑन ड्युटी नाकाबंदी’वर असलेल्या पोलिसाला वाहनाने उडवले