युतीवेळी नाणारबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, स्थानिकांच्या मान्यतेनंतरच प्रकल्प उभारणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशातही शिवसेना-भाजपची युती चर्चेचा विषय होता. त्यावर अखेर तोडगा निघाला आहे. त्यावर आता युतीचे नक्की झाले आहे. आज मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ब्लू सी हॉटेलमध्ये युतीचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना आणि भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र असणार, याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यासोबत राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली.

नाणारमधील प्रकल्पावरही योग्य तो निर्णय घेऊ, तसंच तेथील स्थानिकांची मत लक्षात घेऊन प्रकल्प करण्यात येईल. स्थानिकांच्या मर्जीने प्रकल्प उभारला जाईल. स्थानिकांना मान्य नसेल तर प्रकल्पाची जागा बदलणार, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शिवसेना भाजपमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाले असतील. मात्र सैध्दांतिकदृष्ट्या एकत्र आहोत. राष्ट्रीय विचारांना काहीजण आव्हान देत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे अशी जनभावना आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सत्ता, पदे याला महत्व न देता शेतकरी, गरीबांचे व्यापक प्रश्न घेऊन युतीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

विधानसभेसाठी घटकपक्षांशी चर्चा करुन उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या लढू शेतकऱ्यांच्या प्रश्नी शिवसेना आग्रही, पीकविम्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार, अशी माहिती त्यांनी दिली. तसंच शिवसेना शेतकऱ्यांचे प्रश्नांबाबत आग्रही असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तातडीने आढावा घेणार, असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.