आता नगर भाजपचा बालेकिल्ला झाला ; मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात गेले काही दिवस उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहे. असे असताना आता सुजय पाटील यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. अखेर सुजय विखे-पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथे सुरु आहे. या प्रवेश सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ता रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे उपस्थित आहेत.

डॉ. सुजय विखे पाटलांच्या प्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात अनेक बदल घडवून आणले आहेत. हे तरूणांना माहित आहे. त्यामुळे तमाम तरूणांचे प्रतिनीधी म्हणून सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राजकारणात दमदार लोकांसोबत पाऊल ठेवले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं

नगरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत. तसंच आता नगर भाजपचा बालेकिल्ला झाला, असं म्हणत तेथील दोन्ही जागांवर भाजपचेच खासदार येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सुजय विखेंनी भाजप प्रवेश करण्यासाठी कोणतीही अट ठेवली नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तर आम्ही महाराष्ट्र भाजपच्या वतीने नगरमधून खासदारकीसाठी सुजय विखेंचे नाव पुढे पाठवू, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नगरमध्ये भाजपचा चेहरा हा डॉ. सुजय विखे पाटील असतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे तेथील विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे नेतृत्व धोक्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना पुन्हा एकदा ४५ जागांवर विजय मिळवण्याची गोष्ट केली आहे. २०१९ मध्ये ४२ जागा नाही तर ४५ जागा मिळवणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर ४५ जागा येतीलच असे सांगताना ४२ पेक्षा कमी होणार नाहीत, हेही त्यांनी नमुद केले.

सुजय विखे यांनी बोलताना भाजप प्रवेशाला घरातून विरोध असल्याचे म्हटलं होते. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी सुचक वक्तव्य केले आहे. घरातून विरोध असतानाही त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मात्र पुढे एक ना एक दिवस त्यांच्याही लक्षात येईल की तुमचा निर्णय योग्य होता, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

ह्याहि बातम्या वाचा

दोन सख्ख्या भावांमध्ये मुलीवरून मारहाण

‘एकच वादा… सुजय दादा’; गरवारे क्लबमध्ये सुजय विखेंच्या नावाचाच गजर

काँग्रेस विसर्जित व्हावी ही तर महात्मा गांधींचीच इच्छा : नरेंद्र मोदी 

#GST : १ एप्रिल पासून घरे स्वस्त होणार, ‘इतक्या’ लाखांचा होणार फायदा

माढ्यातील तिढा गृहकलहातून काय ?