मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 12 तासांत सोडविला अमित ठाकरेंचा प्रश्न

पोलिसनामा ऑनलाईन टीम – उद्धव ठाकरे मुख्यमंत्राीपदाची धुरा सांभाळत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह त्यांचे कुटूंबिय त्यांना मदत करीत असल्याचे अनेक घटनांवरुन दिसून आले आहे. मनसेचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्र्याचे पुतणे अमित ठाकरे यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या 12 तासात पूर्ण केली आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना आज त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची पहिली बस आज (गुरुवारी) अहमदनगरला रवाना झाली.

एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षां अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये अडकले होते. त्यांनी घरी जाण्याची मागणी केली असता विद्यार्थ्यांशी काल अमित ठाकरे संवाद साधला होता. त्यानंतक अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला होता. दोन दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांची पहिली बस अहमदनगरला रवाना झाली आहे. ’ अमित ठाकरे प्रयत्नांनामुळे लालपरी विध्यार्थ्यांना घेऊन घरी चालली. आम्हास खात्री आहे पुण्यातील प्रत्येक विध्यार्थी जो पर्यंत जाणार नाही तो पर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार सलाम आपल्याला’ असे ट्वीट एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य’ने केले आहे.