मंदिरं उघडू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळतात का ?, राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाच्या संकटानंतर आता राज्यभरात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील विविध उद्योगधंदे आणि दुकाने सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर आता राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करत आहेत. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खोचक सवाल विचारला आहे. मग आता मंदिर सुरू करू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?,’ असा खोचक सल्ला कोश्यारींनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का, असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवणही करून दिली. तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली.’ अशी आठवण देखील राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. तुम्ही 11 ऑक्टोबरला कोरोना संदर्भात संबोधित करताना मंदिर तुर्तास खुले करणे कठीण सांगितले आहे. काही शिष्टमंडळं मंदिर खुले करावे यासाठी भेटले. त्यामुळे हा पत्रव्यवहार करत असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून उत्तर दिलं आहे. यामध्ये मला कुणीही हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचं देखील म्हणत टोला लगावला आहे.

राज्यपालांनी आपल्या पत्रात लॉकडाऊन शब्द केराच्या टोपलीत टाकायचा आहे असं तुम्ही म्हटलं होतं. मात्र तरीही अद्याप राज्यातील प्रार्थनास्थळं उघडलेली नाहीत. एका बाजूला बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र प्रार्थनास्थळं बंदच आहेत. देव अजूनही लॉकडाऊनमध्येच आहेत. असे म्हटलं होतं. त्यामुळं राज्यातील अनेक शिष्टमंडळांनी माझी भेट घेत मंदिर सुरु करण्याची मागणी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात उत्तर देताना आपण म्हणता गेल्या 3 महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील 3 पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिन्ही पत्रे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची असणे केवळ योगायोग आहे का ? असा टोलादेखील राज्यपालांना लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या पत्रामध्ये राज्यपालांना आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’ असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लावला आहे.त्याचबरोबर मला या संकटाशी लढताना काही दैवी संकेत येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. असा देखील टोला त्यांनी राज्यपाल कोश्यारीना लगावला आहे.