CM Uddhav Thackeray | शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसवलं जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  CM Uddhav Thackeray | विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची (Shirdi) निवड करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (Maharashtra Airport Development Company) संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.

वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही 76 वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट (Area Around Shirdi Hub Airport) म्हणजेच “आशा” असे या विकसित भागाचे नाव असणार आहे. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे महाराष्ट्रातील उत्तम विकास केंद्र बनेल.

 

Web Title : CM Uddhav Thackeray | shirdi airport surrounding developnment get permission from cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mira Bhayandar Crime | मिरा भाईंदर मनपातील अभियंत्याच्या कारवर गोळीबार, परिसरात खळबळ

Viral Letter | दोन बालकांनी पीएम मोदी आणि सीएमला लिहिले ‘हे’ क्यूट पत्र, सांगितल्या आपल्या अडचणी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 113 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

IAS-IPS | अवघ्या 75 कुटुंबाच्या ‘या’ गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी, जाणून घ्या विशेष गावाबद्दल

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,253 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Teacher Provident Fund | शिक्षकांसाठी खूशखबर ! अखेर भविष्य निर्वाह निधीतील मंजूर रक्कम मिळणार