Satara Black Magic Case | ‘ती’ मुलगी बालसुधारगृहात ! स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांना पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्मशानभूमीमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून मांत्रिकाकडून अघोरी पूजा करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील (Satara Black Magic Case) वाई तालुक्यातील सुरूर येथे उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. यानंतर मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी व तिचे नातेवाईक बेपत्ता झाले. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात (Bhuiyanj police station) अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील (Satara Black Magic Case) आरोपींना 24 तासांच्या आत 6 संशयितांना पुण्यातून अटक (six arrested from pune) करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

राहुल राजेंद्र भोसले (वय-26), नितीन लक्ष्मण चांदणे (वय-39), विशाल बाबासाहेब चोळसे (वय-32), सुमन बाळासाहेब चोळसे (वय-50), सुशीला नितीन चोळसे (वय-35), केसर लक्ष्मण चांदणे (वय-55 सर्व रा. बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर, रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींना वाई न्यायालयात (Wai Court) हजर केले असता 30 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावण्यात आली आहे. तर भुईंज पोलिसांनी रात्री सबंधित महिला व पुरुषासोबत त्या मुलीला ताब्यात घेतले आहे. संबंधित मुलीची चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या (Child Welfare Committee) मार्गदर्शनाखाली पुण्यातील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. (Satara Black Magic Case)

सुरुर येथील स्मशानभूमीत मांत्रिकाने एका अल्पवयीन मुलीसोबत बाहेरची बाधा झाली आहे, असे सांगत अघोरी पद्धतीने पूजा केली होती. स्मशानभूमीत हळदी-कुंकवाचे गोल रिंगण आखून त्याशेजारी अंडे, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवली. मुलीला केस मोकळे सोडून बसवत पूजा केली गेली. तिच्या हातात कोंबडाही ठेवण्यात आला. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकाराला अटकाव केला. त्यानंतर संबंधितांनी तेथून पळ काढला होता.

दरम्यान, या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल (SP Ajaykumar Bansal)
यांनी गांभीर्याने दखल घेत भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे (API Ashish Kamble)
व त्यांच्या टीमला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक निवास मोरे (PSI Nivas More), तुकाराम पवार,
प्रशांत शिंदे रविराज वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर यांच्या पथकाने पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरातून सहा जणांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अघोरी पद्धतीने करण्यात आलेल्या पुजेचे नेमकं कारण समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Satara Black Magic Case | satara black magic case six arrested from pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Holidays In Maharashtra | ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची लिस्ट

Radhakrishna Vikhe Patil | ‘जाणत्या राजा’ला सहकार मंत्रालय सुरू करण्याचे का सुचले नाही? – भाजप

Sachin Ahir | महाआघाडी करण्याची इच्छा, मात्र नाही झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी – सचिन अहिर