बस, ट्रेन तसेच दुकानांमध्ये सुट्टया पैशांच्या ऐवजी मिळत असेल ‘चॉकलेट’ तर इथं करा तक्रार, आता होईल तात्काळ कारवाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : अनेकदा दिसते की, जेव्हा तुम्ही सामान खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा दुकानदार तुम्हाला सुट्टे पैशांच्या बदल्यात चॉकलेट किंवा टॉफी देतात. ट्रेन, बसमध्ये सुद्धा असे प्रकार घडतात. काही वर्षांपूर्वी बसेसमध्ये सुटे पैशांच्या बदल्यात चॉकलेट देण्याच्या प्रकरणने खुप जोर पकडला होता. सुटे पैशांच्या बदल्यात चॉकलेट देण्याचा हा प्रकार सर्रास घडत असतो. ग्राहाकांनी पैशांचीच मागणी केली की दुकानदार सुटे पैसे आणायला सांगतात किंवा पुढच्यावेळी अ‍ॅडजेस्ट करण्यास सांगतात.

कॉइनच्या बदल्यात चॉकलेट मिळाले तर करा तक्रार
परंतु, आता देशात नवा कंझ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट-2019 लागू झाल्याने तुम्ही सुटे पैशांच्या बदल्यात चॉकलेट मिळाले तर कंझ्यूमर फोरममध्ये तक्रार करू शकता. ग्राहक यासंदर्भातील तक्रार भारत सरकारची वेबसाइट https://jagograhakjago.gov.in/ आणि https://consumerhelpline.gov.in/ टोल-फ्री नंबर 1800-11-4000 किंवा 14404 नंबरवर सुद्धा करू शकतात. यासोबतच तुम्ही मोबाइल नंबर 8130009809 वर एसएमएसद्वारे सुद्धा तक्रार करू शकता.

आता केंद्र सरकारने याबातचे नियम कडक केले आहेत. देशात कंझ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट 2019 लागू झाल्यानंतर ग्राहकाने जर दुकानदाराची तक्रार केली तर त्याच्यावर कठोर करवाई होईल.

पब्लिक ट्रान्सपोर्टचे ऑपरेटर करतात त्रस्त
लोकांना अनेकदा ही समस्या बस, रिक्षा आणि ट्रेनमध्ये जाणवते. प्रवाशाचे जेव्हा 2-3 रूपये बाकी राहतात तेव्हा पुढच्यावेळी देऊ सांगून टाळले जाते. बसेसमध्ये प्रवास करताना हा नियम आहे की, जर सुट्टे पैसे नसतील तर तिकिटाच्या मागे लिहून दिले जाते. म्हणजे प्रवाशी स्टँडवर उतरून कंट्रोलरकडून ते पैसे घेऊ शकतो. परंतु, अनेक प्रकरणात प्रवाशांना खुप मनस्ताप झाल्यानंतर पैसे मिळतात.