शाहरुख खानला अँक्टिंगमध्ये पहिला ब्रेक देणारे आणि ओशोंचे शिष्य दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याला पहिला अँक्टिंग ब्रेक देणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचं निधन झालं आहे. 11 एप्रिल रोजी दिल्लीत त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी रिताम्भरा यांनी फेसबुकवर शेअर केली होती. असे समजत आहे की, लोधी ऑडिटोरियमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज कपूर यांनीच शाहरुख खानला ब्रेक दिला होता. त्यांनी टीव्ही सिरीयल फौजीमध्ये शाहरुखला साईन केले होते. येथून शाहरुखचा किंग खान बनण्याचा प्रवास सुरु झाला. परंतु त्यांनी असं कधीच मानलं नाही की शाहरुखला सुपरस्टार बनवण्यात त्यांचा काही वाटा आहे. उलट कर्नल राज कपूर नेहमी म्हणत की, शाहरुखला त्याच्या आईवडिलांनीच घडवले आहे. मी फक्त एका योग्य कलाकाराला योग्य काम दिलं आहे. आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर कर्नल राज कपूर हे ओशोचे शिष्य बनले होते. त्यानंतर ते चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईला गेले.

राज कपूर यांनी अनेक टिव्ही सिरीयल प्रोड्युस केल्या तसेच त्यांनी अनेक जाहिरातीही बनवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची वेन शिवा स्माईल नावाची कादंबरीही प्रकाशित झाली होती. एकदा एका मुलाखतीत शाहरुखबद्दल सांगताना ते म्हणाले होते की, “गौतम नगरचा एक लहान सडपातळ मुलगा माझ्या घरी आला होता. त्याला माहिती मिळाली होती की, मी एक शो तयार करत आहे. त्याने आल्या आल्याच सांगितलं की, त्याला अँक्टिंग करायची आहे. मी त्याचा आत्मविश्वास पाहून प्रभावित झालो. नंतर मी त्याला ऑडिशलाही बोलावलं आणि माझ्यासोबत त्याची शर्यतही लावली होती.”

किंग खान शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शाहरुख म्हणतो की, “त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्यांनी नेहमीच मला प्रेरीत केले आहे. आज मी जे काही आहे ते या माणसामुळेच आहे ज्याने एका मुलाचा फौजी बनवला आहे. आम्ही तुम्हाला नेहमी मिस करू. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”