शिवप्रेमींचा संताप अनावर ! पुन्हा एकदा PM मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी ‘तुलना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही महिन्यांपूर्वी एका पुस्तकाच्या शीर्षकावरून नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली होती. तो वाद हळूहळू शांत होत असतानाच दिल्ली विधानसभा निवडणुकांत नव्या वादाला तोंड फोडले आहे, ते भाजपच्या उपाध्यक्षा उमा भारती यांनी.

दिल्ली विधानसभेत भाजपला मोठा झटका बसला असताना उमा भारती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भाजपमध्ये नरेंद्र मोदींसारखा सक्षम नेता दुसरा कोणी नसून सर्व लोकांना फक्त मोदी हवे असल्याचे सांगत त्यांनी ‘ छत्रपती मोदी झिंदाबाद ही घोषणा दिली.

त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात सुद्धा ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जयकुमार गोयल यांच्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आणि भाजपाचा विरोध दर्शविला होता. छत्रपती ही पदवी रयतेने महाराजांना राज्याभिषेकानंतर दिली होती. उमा भारती यांनी छत्रपती मोदी झिंदाबाद असे वक्तव्य केल्यामुळे परत एकदा महाराष्ट्रात शिवप्रेमी संतप्त होऊन राजकारण तापण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाने मोदींना आपलेसे केले आहे. त्यामुळे उमा भारतींनी छत्रपती मोदी झिंदाबाद असे विधान केले असून ही तुलना मागील काही महिन्यांपासून होणाऱ्या इलेक्शनमुळे होत असल्याचे बोलले जात आहे.