ड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8 जणांविरोधात बिहार कोर्टात याचिका दाखल

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स अँगलमध्ये आता बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सची नावे समोर येत आहेत. ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान यासारख्या सेलेब्सची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. त्याचबरोबर बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनशी संबंधित प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणसह 8 सेलेब्स विरोधात बिहारच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ही याचिका मुजफ्फरपूरच्या एसीजेएम न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दीपिका पादुकोण व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, दिया मिर्झा, सारा अली खान, अनुराग कश्यप यांच्यावर आरोप केले गेले आहेत. या सर्वांवर विदेशातून ड्रग्स आयात करणे आणि त्यांची विक्री करणे आणि देशाची प्रतिमा डागाळण्याचा आरोप आहे. ही याचिका वकील सुधीर ओझा यांनी दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.

ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यावर दीया मिर्झाने दिले स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. दीया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, “मी अशा प्रकारच्या अहवालाचे पूर्णपणे चुकीचे, निराधार, वाईट हेतू असल्याचे वर्णन करू इच्छित आहे.” अशा दुर्बल रिपोर्टिंगचा थेट परिणाम माझ्या प्रतिष्ठेवर होईल. हे माझ्या कारकीर्दीवर चिखल करुन ती खराब करण्यासाठी कार्य करेल. जी मी खूप मुश्किलीने आणि वर्षांच्या परिश्रमाने बनविली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात ना कधी ड्रग खरेदी करण्याचे काम केले ना त्याचे सेवन केले.

‘उडता पंजाब’ च्या निर्मात्याचे ड्रग्स प्रकरणात नाव
त्याचवेळी सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीसमोर नवीन नावे समोर येत आहेत. आता टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि ‘उडता पंजाब’ चित्रपटाची निर्माता मधु मांटेना वर्मा यांच्यातील संभाषण पुढे आले आहे. यात तो जया साहाकडून ड्रग्जची मागणी करताना दिसत आहे. हे ड्रग चॅट 22 जून 2020 रोजीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.