आ. योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध अॅन्टी करप्शनकडे तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हडपसर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील मनसेचे गट नते वंसंत मोरे यांनी ही तक्रार दिली आहे. बांधकाम व्यवसायिकाचा फायदा करुन देण्यासाठी आमदार टिळेकर यांनी १ कोटी ४ लाख रुपये किंमतीची मर्सडिज फॉरमॅटीक गाडी लाच स्वरुपात स्विकारल्याचा आरोप केला आहे.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb47516c-ba60-11e8-b636-cb33d6447638′]

आमदार योगेश टिळेकर यांनी आपल्या आमदारकीचा गैरफायदा घेत सेक्टर नं. ३६, ३७ आणि ३८ यांचे आरक्षण बदलले आहे. केवळ बांधकाम व्यवसायिकाचा फायदा व्हावा यासाठी आरक्षण बदलण्यात आले असल्याचे मोरे यांनी एसीबीला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आमदार टिळेकर यांनी गाडी खरेदी करताना उत्पन्नाचा स्त्रोत लपविला आहे. तसेच आयकर विभाग व अन्य कर स्वरुपातील विभागांची दिशाभूल व फसवणूक करण्यासाठी ही गाडी स्वत:चे नावावर केली नाही. ही त्यांनी बांधकाम व्यवसायिक संजीव त्यागी यांच्या नावाने घेतली असल्याचेही मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मर्सडिज गाडी भेट देणाऱ्या व्यक्तीच्या जागेवरील हिलटॉप व रस्त्याचे आरक्षण बदलून ते रहिवाशी करण्यात आले आहे. त्याबदल्यात त्या
बांधकाम व्यवसायिकाचा ५० कोटी पेक्षा अधिकचा फायदा होणार आहे. त्याबदल्यात आमदार टिळेकर यांनी लाच स्वरुपात कोट्यावधीची गाडी घेतली आहे.
[amazon_link asins=’B077ZZ83ZS,B077ZXRB5W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c50b9fb6-ba60-11e8-ba8e-ef84242c5f1d’]

आमदार टिळेकर यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच आमदार टिळेकर आणि बांधकाम व्यवसायिक संजीव त्यागी यांच्या ज्ञात-अज्ञात उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची चौकशी करावी, अशी मागणी वसंत मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.