नवी मुंबई विमानतळाचे काम मे 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महत्त्वाकांक्षी नवी मुंबई विमानतळाचे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण करा अशी डेडलाईन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची ठाकरे यांनी बैठक घेतली व त्यात हे निर्देश दिले. दरम्यान हे विमानतळ जीव्हीके ग्रुपकडून अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

तक्तालीन सरकारने या विमानतळाचे टेकऑफ डिसेंबर २०१९ मध्ये होईल असा दावा केला होता. मात्र, नंतर मे २०२० ची तर नंतर डिसेंबर २०२० ची डेडलाईन ठरविण्यात आली होती. अद्यापही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे येत्या डिसेंबरपासून हे विमानतळ सुरू होऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही परिस्थितीत मे २०२१ पर्यंत विमानतळ सुरू व्हायला हवे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मे २०२१ पर्यंत काम पूर्ण व्हायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.