पुण्याच्या काॅंग्रेस भवनमध्ये गोंधळ ; ‘ती’ निवडणूक रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कसबा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेस संघटनेची आज (बुधवार) दुपारी पुण्यातील काँग्रेस भवनात निवडणूक होती. निवडणूकी दरम्यान केंद्रीय निरीक्षकांनी मतदरांकडे आधार कार्डची मागणी केली. यावरुन मतदार आणि केंद्रीय निरीक्षकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे निरीक्षकांनी निवडणूक रद्द करुन तेथून निघून गेले.

[amazon_link asins=’B01BKEZYBY,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa4e5dd6-b687-11e8-a8f3-fda495098f30′]

पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये कसबा विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेस संघटनेची आज निवडणूक होणार होती. निवडणूकीसाठी केंद्रीय निरीक्षक आले होते. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना निरीक्षकांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांना आधार कार्ड मागितले. मतदारांनी आधार कार्डे दाखवले. मात्र, आधार कार्ड संपूर्ण पाहिजे असल्याचे निरीक्षकांनी सांगितले. यावरुन मतदार आणि निरिक्षकांमध्ये बाचाबाची झाली.

निरीक्षक आणि मतदार यांच्या बाचाबाचिचे रुपांतर हाणामारीत झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी हॉलमधील खुर्चा एकेमेकांच्या दिशेने भिरकावल्या. तसेच टेबलची तोडफोड करुन निरीक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली. या धक्काबुक्कीत त्यांचा लॅपटॉप फुटला. या लॅपटॉपमध्ये महत्वाची माहिती असल्याने चिडलेल्या निरीक्षकांनी निवडणूक रद्द करुन तेथून निघून गेले. या घटनेमुळे काँग्रेस भवनातील वातावरण काही वेळाकरीता तणावाचे झाले होते. पोलिसांनी आणि जेष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्याना शांत राहण्याचे आवाहन केले. निवडणूक प्रक्रिया रद्द झाल्यानंतर देखील काँग्रेस भवनामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

जाहिरात

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.