‘देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय !’ – काँग्रेस

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पत्र लिहित अनेक गंभीर आरोप केलेत. 100 कोटींच्या वसुलीबाबतचा दावाही त्यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य करत मोठा खुलासा केला आणि सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोना (COVID-19) मुळं नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळं त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं पवार म्हणाले होते. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही देशमुख यांचं एक जुनं ट्विट शेअर करत म्हणाले होते की, 15 ते 27 फेब्रुवारी अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते असं शरद पवार सांगतात. परंतु 15 ला ते सुरक्षारक्षकांसह पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. हे नेमके कोण आहेत असा सवाल त्यांनी केला होता. यानंतर आता काँग्रेसनं याला उत्तर देत फडवीसांवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरादर हल्ला चढवला आहे. सत्ता गेल्यानंतर काहींचं मानसिक संतुलन बिघडतं यांचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस असं ते म्हणाले आहेत.

त्यावेळी अमित शाह यांनी राजीनामा दिला का ?

आपल्या ट्विटमध्ये राजू वाघमारे लिहितात, भाजपच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले होते. मग या 22 मंत्र्यांपैकी कोणी राजीनामा दिला ? अमित शाह यांच्या काळात पुलवामा हल्ला झाला. त्यावेळी शाह यांनी राजीनामा दिला का ? भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते ? भाजपनं 2014 पासून त्यांच्या खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली ? असे सवाल राजू वाघमारे यांनी केले आहेत.

‘सत्ता गेल्यावर काही माणसांचं मानसिक संतुलन कसं बिघडतं याचं उत्तम उदाहरण म्हमणजे देवेंद्र फडणवीस’

राजू वाघमारे यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं की, 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली हे खरं आहे. परंतु त्यांनी ती डिस्चार्ज मिळाल्यानंतर हॉस्पिटलच्या आवारातच घेतली. खोटं बोलून संभ्रम तयार करायचा. सत्ता गेल्यावर काही माणसांचं मानसिक संतुलन कसं बिघडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. भाजप नेत्यांनी कृपा करून हे तपासून घ्यावं टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.