Congress Demands Action Against Gunaratna Sadavarte | गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसचे आव्हान, म्हणाले – ‘गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत दाखवा’

मुंबई : Congress Demands Action Against Gunaratna Sadavarte | भाजपाचे (BJP) जवळचे मानले जाणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा (Nathuram Godse) फोटो छापल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या संतप्त प्रकाराबाबत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान दिले आहे. गुणरत्न सदावर्तेवर कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी असे काँग्रेसने म्हटले आहे. (Congress Demands Action Against Gunaratna Sadavarte)

प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी याबाबत संताप व्यक्त करताना म्हटले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान करण्याची हिंमत फक्त भाजपा सरकार असतानाच होते. (Congress Demands Action Against Gunaratna Sadavarte)

गुणरत्न सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापून उदात्तीकरण केले आहे. या विकृत इसमाला तात्काळ बेड्या ठोकण्याची हिंमत गृहमंत्री फडणवीसांनी दाखवावी.

अतुल लोंढे यांनी म्हटले की, गुणरत्न सदावर्ते हा व्यवसायाने वकील असलेला इसम सातत्याने भडकाऊ विधाने करतो. सामाजिक वातावरण गढूळ करतो. म. गांधींबद्दल हा इसम गरळ ओकतो. म. गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा फोटो स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर छापून म. गांधींचा अपमान केला आहे.

भाजपावर टीका करताना लोंढे म्हणाले, गांधींचा विचार आता शिल्लक राहिलेला नाही, असे म्हणत सदावर्तेने
नथुरामचे गुणगान गायले. सदावर्ते या इसमाच्या मागे कोणती शक्ती आहे, त्याचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला माहित आहे.

अतुल लोंढे यांनी मागणी केली की, राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार नाही.
जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार असते तेव्हा तेव्हा नथुरामाच्या औलादी डोके वर काढत असतात.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेवर कडक कारवाई करून महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्यावे.

अतुल लोंढे म्हणाले, गांधीजींच्या नावानेच भारत जगात ओळखला जातो. गांधींच्या नेतृत्वाखालीच भारताने ब्रिटिशांना
भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले हेच काही लोकांना व संघटनांना पचनी
पडत नाही. गांधीजींचा अपमान भाजपा, त्यांच्या सहकारी संस्था व संबंधीत व्यक्ती करत असतात.
अशा प्रवृत्तींना धडा शिकवणे गरजेचे आहे. सरकार याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune Crime News | सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉय विजय ढुमेचा कोयत्याने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ