काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण, ट्विट करून संपर्कात आलेल्यांना केलं ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काँग्रेसचे राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस संपुर्ण देशात वाढत आहे. त्यामध्ये अनेक नेतेमंडळी आणि मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, हलके लक्षणं जाणवल्यानंतर राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी केली.

त्यावेळी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असे त्यांची स्वतः ट्विट करून सांगितले आहे. राहुल गांधी यांनी अलिकडेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य ती पावले उचलावीत असं आवाहन केलं आहे.