‘काँग्रेसने शिवसेना के उद्धव ठाकरे को दुल्हा बना दिया’, ओवेसींची कोपरखळी

तेलंगणा : वृत्तसंस्था – एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीबरोबरच भाजपवर उपहासात्मक टीका केली आहे. भारत पॉलिटिकल मॅरेज अ‍ॅक्टनुसार काँग्रेसनं शिवसेनेसोबत, शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत लग्न केले. तर भाजपचा शिवसेनेसोबत घटस्फोट झाला. आता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना नवरदेव बनवल्याची कोपरखळी यांनी लगावली. तेलंगणा येथील निर्मल येथील महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

महाराष्ट्रातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर खासदार ओवीसी यांनी प्रचारादरम्यान चारही पक्षांना कोपरखळी लगावली. ओवेसी म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भारत पॉलिटिकल मॅरेज अ‍ॅक्टनुसार काँग्रेस पक्षानं शिवसेनेसोबत विवाह केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेसोबत चौथा विवाह केला. तर एमआयएमला देशविरोधी म्हणून शिव्या घालणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला.

आता तर काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना नवरदेव बनवलं आहे. काँग्रेस भारतीय पॉलिटिकल मॅरेज अ‍ॅक्टनुसार शिवसेनेसोबत विवाह करते आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळी जाणून घेतले त्यावेळी समजले की, महाराष्ट्रात एकच पार्टी आहे, त्या विरोधात बोलण गरजेच आहे. नाही बोललो, तर मग कुणाचंही मत मिळत नाही, अशी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपची अवस्था आहे, असे ओवेसी म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा –