‘या’ ८ मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ‘वंचित’ फॅक्टरचा फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी यशापासून वंचित ठेवले. तर वंचितमुळे राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीला यशापासून अनेक ठिकाणी वंचित राहावे लागले. तर वंचितचे उमेदवार जरी विजयी झाले नाहीत तरी त्यांनी घेतलेल्या मतांचा फटका दोन कॉंग्रेसच्या माजी मुख्यंत्र्यांसह एकूण ८ ठिकाणी महाआघाडी आणि कॉंग्रेसला बसला आहे.

राज्यात भाजप शिवसेना प्रणित महायुतीने बाजी मारली. लोकसभा निवडणूकीत राज्यातील ४८ पैकी एकूण ४१ जागा महायुतीच्या पदरात पडल्या आहेत. तर काॅंग्रेस, राष्ट्रवादी प्रणीत महाआघाडीला राज्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. काॅंग्रेसला केवळ १ जागा राखता आली. तर २ माजी मुख्यमंत्र्याना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने मात्र ४ ठिकाणी विजय मिळविला. तर वंचित बहुजन आघाडीचा १ उमेदवार निवडून आला.

राज्यातील ९ मतदारसंघात वंचितने ६ आकडी मते मिळविली. ही मतं काही ठिकाणी विजयी उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्याएवढी आहेत. परंतु इतर ठिकाणी मिळाविलेली मते नगण्य आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत २८८ जागा लढविण्याच्या प्रकाश आंबेडकर यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अशी आहे वंचितची कामगिरी

– सोलापूर आणि अकोला

सोलापूर

वंचित बहुजना आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना मिळालेली मतं -१६९५२३

माजी मुख्यमंत्री व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मते – ३६५२७४

विजयी उमेदवाराचे मताधिक्य – १,५८, ६०८

अकोला

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना मिळालेली मतं – २७८२४१

अकोल्यात कॉंग्रेसच्या हिदायतउल्ला पटेल यांना मिळालेली मते – २५४०९४

विजयी उमेदवाराचे मताधिक्य – २,७५,५९६

– बुलडाणा

वंचितचे उमेदवार बळीराम सीरसकर यांना मिळालेली मते – १,७२,३०६

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांना मिळालेली मते – ३,८८,२९३

प्रतापराव जाधव यांना मिळालेले मताधिक्य – १,३३,२८७

– परभणी

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना मिळालेली मतं – १,४९, ८३४

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना मिळालेली मतं – ४,९६,३७२

संजय जाधव यांना मिळालेले मताधिक्य – ४,२१,९९

– नांदेड

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना मिळालेली मतं – १,६५,३४१
माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मिळालेली मतं – ४,४२,१३८ प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मिळालेले मताधिक्य – ४०,१४८ आहे.

– यवतमाळ-वाशिम

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रविण पवार यांना मिळालेली मतं – ९३,९१८

कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना मिळालेली मतं – ४,२२,४९७

भावना गवळी यांना मिळालेलं मताधिक्य – १,१७,९३९

– सांगली

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना मिळालेली मतं – २,९७,३४९
स्वाभीमानीचे विशाल पाटील यांना मिळालेली मतं – ३,४२,०१६
संजयकाका पाटील यांना मिळालेले मताधिक्य – १६४३५२

– गडचिरोली – चिमूर

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. रमेशकुमार गजबे यांना मिळालेली मतं – १,१०,७३६

कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांना मिळालेली मतं – ४,४०,३३६

अशोक नेते यांना मिळालेले मताधिक्य – ७७,५२६