सत्ता महायुतीची ‘मंत्री’ काँग्रेस राष्ट्रवादीचे ? आघाडीचे 3 डझन ‘दिग्गज’ महायुतीकडून रिंगणात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा शिवसेनेने यंदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून येणाऱ्यांची मेगाभरती केल्याने अनेक ठिकाणी विद्यमान भाजपा आमदारांचे तिकीट कापण्यात आले. अशा किमान ३ डझन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भाजपा, शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढवत आहे. त्यांनी आघाडीच्या सरकारमध्ये महत्वाची पदे भूषविली असे अनेक नेत्यांचा त्यात समावेश असून महायुतीची पुन्हा सत्ता आल्यास त्यांना मंत्रीमंडळात समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे सत्ता जरी महायुतीची आली तरी त्यात मंत्री मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक राहण्याची शक्यता आताच व्यक्त केली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, गणेश नाईक, राणा जगजितसिंह पाटील, भास्करराव जाधव, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, अमर महाडिक, लक्ष्मण जगताप, संजय दिना पाटील, महेश लांडगे, समीर दिघे, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रसिंह भोसले, दिलीप सोपल, जयदत्त क्षीरसागर, अब्दुल सत्तार असे अनेक दिग्गज भाजपा, शिवसेनेकडून लढत आहेत. त्यातील अनेकांनी आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात महत्वाची मंत्रीपदे भुषविली आहेत. त्यामुळे त्यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात घ्यावे लागणार आहे.

पाच वर्षापूर्वी अशाच ३० ते ३५ जणांची भरती भाजपाने करुन घेतली होती. पाच वर्षात काँग्रेसचे नेते ही ओळख अद्याप पुसली गेलेली नाही. आताही हे नेते जरी भाजपा शिवसेनेत दाखल झाले असले तरी त्यांची मुळची ओळख ही काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते ही कधीही पुसली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे सत्ता महायुतीची आणि मंत्री राष्ट्रवादी, काँग्रेसचे अशी स्थिती निर्माण होण्याची भिती आतापासूनच युतीचे नेते खासगीत व्यक्त करु लागले आहेत.

visit : Policenama.com