विरोधी पक्षांतील 9 नेत्यांसह राहुल गांधींचा श्रीनगर दौरा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उद्या जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला भेट देणार आहेत. राहुल यांच्यासह विरोधी पक्षातील इतर ९ नेतेही श्रीनगरला जाणार आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा जम्मू काश्मीरला रवाना होतील.

यावेळी राहुल यांच्यासह सर्व नेते तेथील परिस्थितीचा आढावा घेतील आणि स्थानिक नेते आणि नाकरिकांची भेट घेतील. विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, माकपचे डी राजा, माकप सीताराम येचुरी, डीएम रेती शिव, राष्ट्रवादीचे माजिद मेमन, आरजेडीचे मनोज झा यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर दौर्‍यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर राहुल गांधी उद्या श्रीनगरला जाणार आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काश्मीर बोलाविण्याच्या प्रस्तावाला राहुल गांधींनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले.

विरोधी पक्षनेत्यांच्या टीमला जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी देण्यात यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, यावेळी पक्षाच्या नेत्यांना लोकांना भेटण्याची संधी दिली पाहिजे. राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांना संबोधित करताना ट्विट केले की जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत येण्याचे आमंत्रण स्वीकाराले आहे.

गुलाम नबी दोनदा परतले :
यापूर्वी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले की, राहुल गांधी काश्मीरमधील परिस्थितीबद्दल खोटे बोलत आहेत. त्याच वेळी, कलम ३७० हटवल्यानंतर, कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद दोनदा जम्मू काश्मीरला गेले होते. परंतु त्यांना प्रथम श्रीनगर विमानतळावरून आणि नंतर जम्मू विमानतळावरून दिल्लीला परत जावे लागले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम ३७० काढून टाकल्यानंतर, विरोधी पक्ष केंद्र सरकारवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी व संचारबंदी आणण्यासाठी सातत्याने टीका करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like