गांधी कुटूंबियांचे ‘विश्‍वासू’ खा. डॉ. संजय सिंहांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा, उद्या भाजपामध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांधी कुटुंबाच्या जवळ असलेले संजय सिंह यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. अमेठीच्या राज परिवारातून येणारे संजय सिंह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत ते सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. मात्र त्यांचा दणदणीत पराभव झाला होता.

संजय सिंह सध्या आसाममधून राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांचा खासदारकीचा आणखी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक होता, मात्र त्यांनी याआधीच राजीनामा देत पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. राममंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपचे समर्थन करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राजीनामा देताना ते म्हणाले कि, काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव दिसत असल्याने मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. मोदींच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषवाक्याला प्रेरणा मानून भाजपमध्ये प्रवेश करत आहे. १९९८ साली त्यांनी काँग्रेसच्या सतीश शर्मा यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला होता. त्यानंतर १९९९ सालच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्री देखील होते. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, २०१४ मध्ये ते काँग्रेसवर नाराज झाले होते. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांची समजूत काढत त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. त्यांचे दोन विवाह झाले असून त्यांच्या एका पत्नीने सुल्तानपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. तर दुसरी पत्नी सध्या अमेठीमधून भाजपच्या आमदार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1156131096658157568

आरोग्यविषयक वृत्त –