काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केली बँकांची ’डिफॉल्टर लिस्ट’, लिहिलं – ‘देशातील लूटमारीची खरी कहानी’

नवी दिल्ली : काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट करून नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी रविवारी ट्विट करून ऑल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशनकडून जारी करण्यात आलेली एक डिफॉल्टर लिस्ट शेयर केली आहे. या लिस्टमध्ये भारतातील 17 बँकांचे डिफॉल्टर ग्राहक आणि त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम लिहिली आहे. या ट्विटसोबत सुरजेवाला यांनी कॅपशनमध्ये लिहिले आहे, देशाच्या पैशाच्या लूटमारीची खरी कहानी.

सुरजेवाला यांच्याकडून ट्विट करण्यात आलेल्या लिस्टनुसार, देशभरातील 17 बँकांमधून 2 हजार 426 लोकांनी 1 लाख 47 हजार 350 कोटी रूपयांचे कर्ज घेतले आहे. बँकांकडून कर्ज घेतल्यानंतर या लोकांनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केले आहे आणि कर्ज रक्कम परत करण्यास नकार दिला आहे.

सुरजेवाला यांच्या ट्विटचा अर्थ काय?
या ट्विटद्वारे रणदीप सुरजेवाला यांनी सरकारला बँकाच्या वाईट स्थितीला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस प्रथमपासूनच आरोप करत आली आहे की, नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीसारखे मोठे उद्योगपती देशातील बँकांना हजारो कोटींचा चूना लावून देशातून फरार झाले आहेत.

बँकांच्या लिस्टवर टाका नजर

स्टेट बँक ऑफ इंडिया- 685 लोकांनी सुमारे 43,887 कोटी कर्ज घेऊन ठेवले आहे.

पंजाब नॅशनल बँक – 325 लोकांवर 22.370 कोटी

बँक ऑफ बडोदा- 355 लोकांवर 14,661 कोटी

बँक ऑफ इंडिया – 184 लोकांवर 11,250 कोटी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया- 69 लोकांवर 9,663 कोटी

युनायटेड बँक ऑफ इंडिया- 128 लोकांवर 7,028 कोटी

युको बँक- 87 लोकांवर – 6,813 कोटी

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स – 138 लोकांवर 6,549 कोटी

कॅनरा बँक – 96 लोकांवर 5,276 कोटी

आंध्रा बँक – 84 लोकांवर 5,165 कोटी

इलाहाबाद बँक – 57 लोकांवर 4,339 कोटी

इंडियन ओव्हरसीज बँक – 49 लोकांवर 3,188 कोटी

कॉर्पोरेशन बँक – 58 लोकांवर 2,450 कोटी

इंडियन बँक – 27 लोकांवर 1,613 कोटी

सिंडिकेट बँक-36 लोकांवर 1,438 कोटी

बँक ऑफ महाराष्ट्र – 42 लोकांवर 1,405 कोटी

पंजाब अँड सिंध बँक- 6 लोकांवर 255 कोटी