राफेल घोटाळ्या विरोधात नांदेड मध्ये काँग्रेसचा भव्य मोर्चा

नांदेड : पाेलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केंद्र शासनाच्या ४१००० कोटी राफेल विमान खरेदी घोटाळा विरोधात २५ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता महात्मा फुले पुतळापासून (आय. टी. आय) ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत निषेध मोर्चा आज काढण्यात आला आहे.  भोकर तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मध्ये हजेरी लावली हा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.  या भव्य जाहीर निषेध मोर्चाला हजारो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’520b67d1-c0db-11e8-907d-3b1ec609756e’]

राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणात जाहीर मोर्चा केंद्र शासनाच्या (४१हजार कोटी) राफेल विमान खरेदी घोटाळा विरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशाने नांदेड येथे भव्य जाहीर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा चे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कडे देण्यात आले त्या वेळी अनेक वरिष्ठ काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते त्यामधे सहभागी नांदेड शहरअध्यक्ष आमदारअमरनाथ राजूरकर, आमदार डी.पी.सावंत साहेब, आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब आमदार  कवाडे , नांदेड चे महापौर शीला किशोर भवरे , ऊप महापौर गीरडे विनय पाटील , शंकर शिंदे, पप्पू कोंडेकर, रावनगावकर, जगदीश भोसीकर, संग्राम निलपत्रेवार, सिद्धेश्वर पिटलेवाड, विनोद चव्हाण चिदगिरीकर, गोविंद मेटकर, विकास क्षिरसागर व हजारोंच्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते भाजप सरकारचा धिकार असो असे नारे यावेळी देण्यात आले.

पिंपरी : पोलिसांमधील वाईट सवयी संपवणार : पद्मनाभन

आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय