Congresss Power Show In Nagpur | काँग्रेस आज लोकसभेचे रणशिंग फुंकणार! सोनिया गांधी, राहुल, खरगे आज नागपुरात, पाचशेहून अधिक नेत्यांची उपस्थिती

नागपूर : Congresss Power Show In Nagpur | आज नागपुरात काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Congress Leader Sonia Gandhi), खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासह तब्बल पाचशे पेक्षा जास्त नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करत लोकसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Congresss Power Show In Nagpur)

या सभेत तीन मोठ्या व्यासपीठावर पाचशेहून अधिक नेते, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी विराजमान झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंग, भुपेश बघेल, मुकुल वासनिक, वेणूगोपाल आदी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित झाले आहेत. याशिवाय महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या शेजारच्या राज्यातून कार्यकर्ते, नागरिक जमले आहेत.

कार्यक्रमाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. त्या आधी देशभरातील नेते उपस्थिती लावत आहेत. है तय्यार हम अशा घोषणा देत अनेक कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी दाखल होत आहेत. आम्ही राहुल गांधी यांना ऐकायला आलोय, भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ही सभा असल्याच्या भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहेत. (Congresss Power Show In Nagpur)

दरम्यान, सभेसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी नागपुरात
दाखल होत आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते यापूर्वीच नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत.
एका खासगी बांधकाम कंपनीच्या सुमारे २४ एकर जागेवर ही सभा होत आहे. यासाठी तीन मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहेत.

मध्यभागी असलेल्या व्यासपीठावर सुमारे ५५ ते ६० नेते बसतील तर त्या व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला सुमारे ४५० जणांची
क्षमता असलेले दोन मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या तीनही व्यासपीठापासून काही अंतर राखून प्रमुख पदाधिकारी,
कार्यकर्त्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सभेला पाच लाख लोक येथील असा दावा आयोजन समितीचे सदस्य गिरीश पांडव यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Soha Ali Khan Exercise | फिट राहण्यासाठी अभिनेत्री सोहा अली खान करते ‘ही’ एक्सरसाइज, जाणून घ्या तिचे ‘फिटनेस सीक्रेट’

Juice in Winters | हिवाळ्यात ज्यूस पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी गाडी देण्याच्या बहाण्याने तीन तरुणींची 35 लाखांची फसवणूक, वाघोली परिसरातील प्रकार