पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या प्रभागांची ‘कोरोना’बाधितांची आकडेवारी जाहीर, जाणून घ्या 20 ठिकाणची संख्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूने पुणे शहरात थैमान घातले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे शहरातील पेठांमध्ये सर्वाधिक झाला आहे. पुणे महापालिकेने भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागाच्या प्रत्येक भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी जाहीर केली आहे. 26 मार्च ते 4 जून पर्यंत असलेली ही आकडेवारी आहे. या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.18 मध्ये आतापर्यंत एकूण 371 कोरोना बाधितांची संख्या असून ही सर्वाधिक संख्या आहे. तर बरे झालेले रुग्ण एकूण 262 आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची सर्वाधिक संख्या प्रभाग क्र. 19 मध्ये असून याठिकाणी 24 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्य परिस्थितीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा असलेल्या प्रभाग क्र. 17 असून या ठिकाणी 120 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अनेक भागात 70 ते 80 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसत नाहीत. मात्र, तपासणी दरम्यान अनेक जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. विशेषत: दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये अजूनही अनेक ठिकाणी मास्कचा वापर केला जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेकजण तर चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात. यामध्ये तोंडावरचा मास्क काढून गळ्यात घालणे व अर्धा ओठांवर लावून त्याला सतत हात लावणे असे प्रकार सुरु आहेत. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे.

डॉ. दिघे यांनी पुढे सांगितले की, विशेषत: फेरीवाले, भाजी विक्रेता यांच्यामार्फत कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजी फळे ही स्वच्छ धुवून घेतली पाहिजेत. वारंवार हात धुवून जवळपास हाताळणाऱ्या वस्तू सॅनिटईज केल्या पाहिजेत. कोरोनामुळे बहुसंख्य नागरिकांच्या जीवाला धोका होत नसला तरी मधूमेह, रक्तदाब, किडनी सारखे आजार नियंत्रणात न ठेवल्यामुळे बाधितांच्या जीवाला धोका संभवू शकतो. त्यामुळे आजारांवर वेळोवेळी उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभागातील सविस्तर आकडेवारी –
प्रभाग 17 मधील एकूण 214 पैकी 76 रुग्ण बरे झाले. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 120 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नाना पेठेमध्ये 43 पैकी 27 रुग्ण बरे झाले तर 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. रास्तापेठेत 40 पैकी 28 रुग्ण बरे झाले असून 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 पॉझिटिव्हि आहेत.

गणेश पेठेमध्ये 36 पैकी 12 रुग्ण बरे झाले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण पॉझिटिव्ह आहेत. नाडे गल्ली मध्ये 21 पैकी 21 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
चामडे गल्लीमध्ये 15 पैकी 2 रुग्ण बरे झाले असून 13 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. बुधवार पेठेमध्ये 29 पैकी 4 जण बरे झाले असून सध्या 25 जण पॉझिटिव्ह आहेत. रेड लाईट एरियात एकूण 15 जण पॉझिटिव्ह आहेत.

रविवार पेठेत 13 पैकी 2 रुग्ण बरे झाले असूनच4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण पॉझिटिव्ह आहेत.
कुभारवाडा येथे 2 कोरोनाची प्रकरणे असून 1 रुग्ण बरा झाला असून 1 पॉझिटिव्ह आहे.  प्रभाग क्रमांक 18 येथे 371 प्रकरणांपैकी 262 रुग्ण बरे झाले असून 20 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 89 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

काची आळीमध्ये 18 पैकी 12 रुग्ण बरे झाले तर 2 जणांचा मृत्यू सध्या 4 पॉझिटिव्ह आहेत
शुक्रवार पेठेत 2 पैकी 1 रुग्ण बरा झाला आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.
गुरुवार पेठेत 4 कोरोनाबाधित होते हे सर्वजण बरे झाले असून रुग्ण संख्या शून्य आहे.
रविवार पेठत 7 पैकी 6 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या एकही पॉझिटिव्ह नाही.
खडकमाळ आळी येथे 8 रुग्ण होते ते सर्व बरे झालेत. रुग्ण संख्या शून्य आहे.

घोरपडे पेठेत 24 पैकी 8 रुग्ण बरे झाले तर 16 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
स्वारगेट पोलीस लाईनमध्ये 3 कोरोना रुग्ण होते. हे सर्व बरे झाले आहेत. रुग्ण संख्या शून्य आहे.
353 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 46 प्रकरणांपैकी 32 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 13 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

343 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 52 प्रकरणांपैकी 36 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 15 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
घोरपडे पेठ मोमिनपुरा कब्रस्तान लगत संपूर्ण परिसरात 39 प्रकणांपैकी 28 रुग्ण बरे झाले. तर एकाचा मृत्यू झाला असून 7 पॉझिटिव्ह आहेत.

घोरपडडे पेठ शाळा क्रमांक 13 लगत संपूर्ण परिसरात एकूण 24 पैकी 33 रुग्ण बरे झाले. एकाचा मृत्यू तर 12 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 314 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 26 प्रकरणांपैकी 18 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 6 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 365 घोरपडे पेठ संपूर्ण परिसरात एकूण 42 प्रकरणांपैकी 36 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 5 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
180 घोरपडे पेठ स्वारगेट लगतच्या संपूर्ण परिसरात एकूण 10 प्रकरणांपैकी 1 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 633 गंज पेठ महात्मा फुले पेठेतील 9 पैकी 7 रुग्ण बरे झाले आहेत तर 2 जणाचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या शून्य झाली आहे.

गंज पेठ मासे आळी येथे 24 पैकी 17 रुग्ण बरे 4 जणांचा मृत्यू तर 3 पॉझिटिव्ह
मनपा वसाहत क्र.6 मध्ये एकूण 12 पैकी 11 जण बरे झाले तर एकाचा मृत्यू. रुग्ण संख्य शून्य
महात्मा फुले स्मरक गंज पेठ संपूर्ण परिसरात 3 पैकी 1 रुग्ण बरा झाला. तर दोन जणांचा मृत्यू झाला. रुग्ण संख्या शून्य आहे. प्रभाग 19 येथे 249 पैकी 189 रुग्ण बरे झाले. तर 24 जणाचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी 36 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. कासेवाडी येथे 32 पैकी 10 रुग्ण बरे झाले. 11 जणांचा मृत्यू तर 11 पॉझिटिव्ह आहेत. गुरुनानक नगर येथे 4, शंकर शेठ 2 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

हरकानगर येथे 9 पैकी 8 रुग्ण बरे झाले तर एकाचा मृत्यू झाला. रुग्ण संख्या शून्य 512 भवानी पेठेतील 6 पैकी 4 रुग्ण बरे झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला. सध्या रुग्ण संख्या शून्य जुना मोटार स्टॅनंड येथे 4 पैकी 3 रुग्ण बरे झाले. तर एकाचा मृत्यू झाला. रुग्ण संख्या शून्य चुडामण तालीम येथे 2 पैकी 1 रुग्ण बरा झाला तर एकाचा मृत्यू. रुग्ण संख्या शून्य लोहियानगर गल्ली क्रमांक 1ते 5 येथे 53 पैकी 35 रुग्ण बरे झाले तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. एकबोटे कॉलनी येथे 5 पैकी 1 रुग्ण बरा झाला तर 4 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

इनामकेमळा परिसरात 24 पैकी 24 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण संख्या शून्य 824/830 भवानी पेठ भवानी माता मंदिरा जवळील संपूर्ण परिसरात 38 पैकी 33 रुग्ण बरे झाले तर एकाचा मृत्यू झाला. 4 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 377/78 भवानी पेठ बालाजी मंदिर परिसरात 32 पैकी 32 रुग्ण बरे झाले. रुग्ण संख्या शून्य ए.डी. कॅम्प चौक ते भारत सिनेमा परिसरात 26 पैकी 26 रुग्ण बरे झाले. रुग्ण संख्या शून्य
817 भवानी पेठ येथे 12 पैकी 12 रुग्ण बरे झाले. रुग्ण संख्या शून्य

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like