खुशखबर ! नोकरदारांना पुढील वर्षी मिळणार 7.3 % वेतनवाढ

नवी दिल्ली : कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आणले. वेळप्रसंगी वेतनकपातही केली. मात्र आता नोकरदारांसाठी खुशखबर आहे यावर्षी ६.१ टक्के वेतनवाढ मिळाली, तर २०२१ मध्ये सरासरी ७.३ टक्के वेतनवाढ मिळण्याचा अंदाज आहे.व्यावसायिक सेवा क्षेत्रातील ‘एओन’ कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात काही सकारात्मक मुद्दे मांडले आहे.

कंपन्यांनी आपले कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये गुंतवणूक केली आहे. कोरोना संकटातही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांप्रति परिपक्वता दाखवल्याचे ‘एओन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठी यांनी म्हटले आहे.

कंपनीच्या अहवालानुसार कोरोनाच्या काळातही देशातील अनेक कंपन्यांनी लवचिकता दाखविली आहे. सुमारे ७१ टक्के कंपन्यांनी २०२० मध्ये वेतनवाढ दिली होती. परंतु, २०२१ मध्ये यापेक्षा अधिक, म्हणजे ८७ टक्के कंपन्यांनी वेतनवाढ देण्याची तयारी दर्शविली आहे. भारतात यावर्षी सरासरी ६.१ टक्के वेतनवाढ राहिली आहे. गेल्या दशकातील ही नीचांकी वेतनवाढ राहिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षी सरासरी ७.३ टक्के वाढ मिळू शकते.