कोरोना काळात भिजवून खा ड्राय फ्रूट्स, इम्यून सिस्टम होईल मजबूत, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी, थकवा, कमजोरी, रक्ताची कमरता किंवा अ‍ॅनिमिया इत्यादीपासून दिलासा मिळू शकतो. याशिवाय यामुळे हाडे मजबूत बनवणे, डायबिटीज कंट्रोल ठेवणे, स्मरणशक्ती मजबूत करणे, वजन कमी करणे, काविळ यासारख्या आजारात मदत मिळते.

बदाम भिजवून खाल्ल्यानेसुद्धा त्याची पोषकतत्व वाढतात. तसेच भिजवलेले आक्रोड शरीरात कमी उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा याचे सेवन चांगले आहे.

रोज किती नट्स खावे :
चांगल्या आरोग्यासाठी रोज 5-7 मनुके, 2-3 अक्रोड, 7-10 बदामांचे सेवन करू शकता.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे :
भिजवलेले बदाम वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. मेंदूची क्षमता वाढवतात. कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि त्वचेसाठी सुद्धा चांगले असतात. डायबिटीज रूग्णांसाठी सुद्धा ते चांगले आहेत, तसेच कॅन्सरला रोखतात, तणाव कमी करण्यास मदत करतात, चांगल्या झोपेसाठी उपयोगी आहेत.

भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे :
रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी, थकवा, कमजोरी, रक्ताची कमतरता किंवा अ‍ॅनिमिया इत्यादीपासून आराम मिळतो. तसेच हाडे मजबूत होतात, डायबिटीज कंट्रोल राहतो, स्मरणशक्ती मजबूत होते, वजन कमी होते, काविळमध्ये लाभदायक आहे.

भिजवलेले आक्रोड खाण्याचे फायदे :
रोज सकाळी रिकाम्या पोटी आक्रोड खाल्ल्याने डायबिटीज कंट्रोल ठेवणे, वजन कमी करणे, औदासिन्य आणि तणाव दूर करणे, हाडे मजबूत बनवण्यात मदत होते. तसेच हृदय निरोगी राहते, बद्धकोष्ठता दूर होते.