Corona in Maharashtra | ‘कोरोना’ रुग्णसंख्येत वाढ सुरुच, राज्यात आज 3 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची (Corona in Maharashtra) संख्या वाढत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona in Maharashtra) असल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य विभागाने (Department of Health) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर दिवसभरात 1323 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आजपर्यंत 77 लाख 43 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.96 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 1.87 टक्के एवढा आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात सध्या 13 हजार 329 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत (Mumbai) आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 9 हजार 191 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 70 टक्के सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. याखालोखाल ठाणे (Thane) 2157, पुणे (Pune) 884, पालघर (Palghar) 314, रायगड (Raigad) 411 सक्रिय रुग्ण आहेत.
Maharashtra | 3081 new COVID cases were reported today in the state while 1323 patients were discharged. With zero deaths today, active cases stood at 13,329 pic.twitter.com/d4oUxFF3ee
— ANI (@ANI) June 10, 2022
मुंबईने चिंता वाढवली
आज राज्यात 3081 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 79 लाख 04 हजार 709 झाली आहे. मुंबईत सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्याच्या तुलनेत मुंबईत जवळपास 70 टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज तब्बल 1956 दैनंदिन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर ठाणे मनपा 222, नवी मुंबई मनपा 201, पुणे मनपा 135 रुग्ण आढळले आहेत.
Web Title :- Corona in Maharashtra maharashtra reports 3081 new covid cases
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update